कै.धोंडू नाऊ.ठाकरे कनिष्ठ महाविद्यालयातील कुस्ती वीरांची सुवर्णपदकासह राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.*
![]()
*कै.धोंडू नाऊ.ठाकरे कनिष्ठ महाविद्यालयातील कुस्ती वीरांची सुवर्णपदकासह राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.*
*”कु.जीत सुनिल भोईर व कु.हर्षद प्रवीण चौधरी यांनी मुंबई विभागीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले असून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.
*
ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे द्वारा आयोजित मुंबई विभागांतर्गत शालेय क्रीडा विभागीय कुस्ती स्पर्धा सन 2025-26 (१४, १७ व १९ वर्षाखालील मुले व मुली फ्रिस्टाईल व 17 व 19 वर्षे मुले ग्रीकोरोमन )
स्पर्धचे आयोजन दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा क्रीडा परिषद रायगड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड आणि पोलीस मुख्यालय नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. मुंबई विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत रांजनोली येथील
कै.धोंडू एन.ठाकरे कनिष्ठ महाविद्यालयाचे कुस्तीवीर कु.जीत सुनिल भोईर (६३kg) व कु.हर्षद प्रवीण चौधरी (६७kg) यांनी मुंबई विभागीय शासकीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकासह प्रथम क्रमांकाने यश संपादन केले असून त्यांची राज्यस्तरीय शासकीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.त्याबद्दल संस्थापक अध्यक्ष करसन ठाकरे,प्राचार्य सचिन ठाकरे, प्राचार्य गोरक्षनाथ तरे, प्रा. हर्षद शेटे, प्रा. दयानंद कांबळे, प्रा. आर. आर. कसबे, प्रा. मयुरेश दळवी, आय टी विभाग प्रमुख प्रा.माधव कांबळे,प्रा.मनिषा यादव, प्रा.ऐश्वर्या चव्हाण,यांच्यासह विशाल सर,सौ.सोनाली पवार,स्वाती भोईर,विनायक ढोबळे यांनी अभिनंदन केले आहे.तसेच महाविद्यालयाचे स्पोर्ट्स डायरेक्टर डॉ.मनिलाल शिंपी यांच्या मेहनतीमुळे आपल्या कॉलेज ला हे यश मिळाले आहे अशा शब्दात महाविद्यालयाचे एडमिन श्री. रुपेश तरे यांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे.
महाविद्यालयाचा क्रीडा क्षेत्रात यशाचे खरे मानकरी आमचे क्रीडा संचालक डॉ. मनिलाल शिंपी हेच आहेत.महाविद्यालयातील खेळामध्ये विशेष प्राविण्य मिळवण्यासाठी खऱ्या अर्थाने अतिशय कठोर मेहनत करून विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रवृत्त करून हे यश संपादन करण्यासाठी आमच्या महाविद्यालयाचे क्रीडा प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी यांची खरी मेहनत व जिद्द आहे. असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. करसन ठाकरे यांनी विशेष अभिनंदन करताना सांगितले.

