मुथा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची भौगोलिक क्षेत्रभेट.*
1 min read

मुथा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची भौगोलिक क्षेत्रभेट.*

Loading

*मुथा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची भौगोलिक क्षेत्रभेट.*

ठाणे: कल्याण:(मनिलाल शिंपी)
कल्याण महानगरपालिका अंतर्गत वाडेघर जवळील मलनिस्सारण केंद्रास मुथा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भौगोलिक क्षेत्रभेट दिली. त्यामध्ये कल्याण शहरातून येणारे मलयुक्त सांडपाणी प्रक्रिया करून कसे शुद्ध केले जाते याची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांनी घेतली.
मलनिस्सारण केंद्राचे प्रमुख राकेशकुमार सिंग, लॅब टेक्निशियन चौधरी सर व सुपरवायझर अजय जैस्वाल यांनी विद्यार्थ्यांना सर्व विभागांची माहिती दिली.
इनलेट द्वारे मलयुक्त पाणी प्लांट मध्ये आल्यावर प्रथम दर्शनीय टॅंक मध्ये त्यातील प्लास्टिक,कागद व इतर कचरा वेगळा होतो त्यानंतर दुसऱ्या टॅंक मध्ये पाण्यातील जड घटक म्हणजेच गाळ (स्लज) वेगळा केला जातो. त्यानंतर दीड तास पाणी विस्तीर्ण अशा टँक मध्ये हवा मुक्तपणे मिसळण्यासाठी संत ठेवले जाते. या प्रक्रियेत त्यांच्या खालच्या भागातूनही हवा पाण्यात सोडली जाते इथून पुढच्या टॅंक मध्ये पाण्यात 0.3 पीपीएम पर्यंत क्लोरीन वायू मिश्रित केला जातो. म्हणजेच क्लोरीनेशन प्रक्रिया होते त्यानंतर ते पाणी तीन मध्यम आकाराच्या टॅंक मध्ये येते यावेळेस हे पाणी बऱ्यापैकी शुद्ध झालेले स्पष्टपणे दिसून येते
लॅब टेक्निशियन श्री चौधरी सर यांनी लॅबोरेटरी मध्ये अशुद्ध पाणी प्रक्रिया, मुक्त पाणी, व शुद्ध पाणी यांची प्लांट मधील स्थिती प्रात्यक्षिक करून दाखवली लॅबोरेटरी मधील बोर्डावर पाण्यातील विविध घटकांचे प्रमाण लिहिलेले दाखविले या पूर्ण केंद्रातून दर तीन तासाला दोन एम एल डी एवढे पाणी शुद्ध केले जाते याप्रमाणे दर दिवसाला 18 एम एल डी एवढे पाणी शुद्ध होते.( एक एम एल डी म्हणजे दहा लाख लिटर पाणी) हे शुद्ध झालेले पाणी स्थानिक गार्डन तसेच रोपवाटिकांना वापरले जाते व उर्वरित पाणी नदीत सोडले जाते.
सर्व विद्यार्थ्यांना ही प्रक्रिया श्री चौधरी सर यांनी योग्यरीत्या समजावून सांगितली विद्यार्थ्यांनी माहिती समजावून घेत असताना अनेक प्रश्न विचारले व या सर्व प्रश्नांचे, शंकांचे समाधानकारक निरसन केले. सर्व प्रक्रिया समजल्याने व प्रत्यक्ष मलयुक्त सांडपाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया अनुभवल्याने विद्यार्थी आनंदित झाले.
या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांना भौगोलिक संकल्पना घटक आणि प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. केवळ पाठ्यपुस्तकांमध्ये भौगोलिक संकल्पना वाचण्याऐवजी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे भौगोलिक माहिती अभ्यासण्याची संधी मिळाली
या भौगोलिक क्षेत्र भेटीमध्ये मुथा महाविद्यालयातील एकूण 90 विद्यार्थी सहभागी झाले. तसेच महाविद्यालयातील भूगोल विषयाचे प्रा. जगन मिरकुटे व प्रा. रुपेश पोटभरे यांनी सक्रिय सहभाग दर्शविला. यांसह दिनेश थळे, सौ.उषा रावडे, सौ.प्रीती कुलकर्णी इत्यादी प्राध्यापक उपस्थित होते या भौगोलिक क्षेत्र भेटीसाठी शेठ हिराचंद मुथा शैक्षणिक ट्रस्ट संचालित शेठ हिराचंद मुथा महाविद्यालयाचे चेअरमन प्रकाशजी मुथा, प्राचार्य सौ. अनुजा ब्रह्म यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *