महादेव मंदिर विटनेर येथे मोफत महाआरोग्य शिबिर संपन्न..*
![]()
*महादेव मंदिर विटनेर येथे मोफत महाआरोग्य शिबिर संपन्न..*
दि. 29/9/25,सोमवार रोजी महादेव मंदिर विटनेर येथे,
चि. सात्विक नवल परदेशी याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त *श्री. चामुंडामाता होमिओपॅथी महाविद्यालय आणि श्री. पी. ई. तात्या पाटील रुग्णालय* यांच्यामार्फत मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यादरम्यान सर्व रुग्णांची नेत्रदोष तपासणी करण्यात आली. ‘नमो नेत्र स्वास्थ अभियानांतर्गत’ विटनेर गावातील 27 रुग्णांवर मोफत मोदीबिंदू शास्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच त्वचारोग, अस्थिरोग, स्त्री-रोग, मूत्र रोग, पोटाचे विकार,श्वसनाचे आजार सांधेदुखी,दुर्दळ आजार ई. अशा शरीरातील सर्व आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून मोफत होमिओपॅथी औषधाची वितरण करण्यात आले. या शिबिराचा विटनेर गावातील 400 रुग्णांनी लाभ घेतला. यामध्ये होमिओपॅथी तज्ञ डॉ.सिद्धेश्वर पाटील, डॉ.अमिता श्रीवास्तव, डॉ. सोनाली मोरे, फिजिओथेरपी तज्ञ डॉ. अभिलाषा मुंदडा व नेत्रचिकित्सक डॉ. जयेश वाल्हे यांनी रुग्णांची तपासणी करून सर्व रुग्णांना मोलाचे मार्गदर्शन केले.
विटनेर गावातील जय भोले मित्र मंडळ व वक्रतुंड मित्र मंडळ व सर्व कार्यकर्त्यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.


