विज्ञान गणित विषयांचा अभ्यास जीवनाचे कोडे सोडवते-सुनील वानखेडे .
1 min read

विज्ञान गणित विषयांचा अभ्यास जीवनाचे कोडे सोडवते-सुनील वानखेडे .

Loading

विज्ञान गणित विषयांचा अभ्यास जीवनाचे कोडे सोडवते-सुनील वानखेडे .

विद्यार्थी जीवनात विज्ञान गणित विषयांचा अभ्यास पक्का झाल्यास जीवनातल्या अनेक प्रश्नांची ,समस्यांची सोडवणूक,जीवनाचे कोडेच सुटण्याचाच मार्ग मिळतो यासाठी गणिताकडे कठीण विषय म्हणून न पाहता सरावातून त्यास सोपा करावा असे मत ए पी जे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट इंडिया. यांच्या माध्यमातून विज्ञान पोस्टर प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी सुनील वानखेडे यांनी व्यक्त केले.ते पुढे म्हणाले, गणित व विज्ञान विषयाची विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी व त्यांच्यात असणारी विषयासंबंधीची भीती दूर व्हावी यासाठी गणित विषयांमध्ये छोट्या छोट्या ट्रिक्स चा वापर केला तर गणित सहज सोडवले जाते. तसेच विज्ञान विषयातील छोट्या छोट्या प्रयोगाद्वारे वैज्ञानिक संकल्पना सहज समजण्यास उपयुक्त ठरतात असेही त्यांनी मांडले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन जंगले यांनी केले. परिचय पी.जे. बऱ्हाटे यांनी केला. आभार प्रदर्शन वृषाली चौधरी यांनी केले. याप्रसंगी विचार मंचावर ज्येष्ठ शिक्षिका मंगला नारखेडे, गोपाळ महाजन ,विज्ञान विषय प्रमुख विज्ञान मंडळ प्रमुख कविता भोळे उपस्थित होते या प्रसंगी छायेंद्र पाटील, श्लोक गवळी भावेश पाटील या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन बक्षिसे मिळवली.विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शनीचे देखील आयोजन करण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *