तालुका स्तरावर नागरिकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शिबीर – सुविधा व लाभांचा मेळावा ,आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते अमळनेर शिबीरात समाधानाची वारी
![]()
तालुका स्तरावर नागरिकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शिबीर – सुविधा व लाभांचा मेळावा
आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते अमळनेर शिबीरात समाधानाची वारी
अमळनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील दि. 25 मार्च 2025 च्या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत ” तालुका स्तरावर नागरिकांसाठी दिनांक 26/09/2025 (वार शुक्रवार) रोजी इंदिरा भवन मंगल कार्यालय स्टेट बँकेच्या मागे, अमळनेर ता.अमळनेर येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराचे उदघाटन मा. आमदार दादासो अनिल भाईदास पाटील यांचे हस्ते करण्यात आले. तसेच सदर शिबीरात मा. आमदार दादासो अनिल भाईदास पाटील यांनी भेट देवून नागरिकांशी संवाद साधला.
सदर शिबीरात श्री. रुपेशकुमार सुराणा तहसिलदार अमळनेर, श्री. नरेंद्र पाटील गटविकास अधिकारी अमळनेर, श्रीमती प्रेमलता पाटील महिला व बालकल्याण अधिकारी, श्री. अजय कुलकर्णी महसुल नायब तहसिलदार, श्री सी.यु.पाटील निवासी नायब तहसिलदार, श्री. प्रशांत धमके निवडणुक नायब तहसिलदार, श्री. राजेंद्र ढोले संजय गांधी योजना नायब तहसिलदार व तालुका स्तरावरील सर्व कार्यालये यांचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. प्रत्येक विभागाने स्वतः उपस्थित राहून आपआपल्या विभागाचे स्टॉल लावून मंडळ भागातील सर्व गावातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, विदयार्थी व महिला यांचे शासकीय विभागांशी संबंधित तक्रारींचे/समस्यांचे निराकरण करुन वंचित लाभार्थीना मा. आमदार दादासो अनिल भाईदास पाटील व श्री. रुपेशकुमार सुराणा तहसिलदार अमळनेर यांचे हस्ते प्रमाणपत्र/धनादेशाचे वाटप करण्यात आले. उक्त शिबीरात खालील कार्यालयांकडून लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले.
लाभ देण्यात आलेल्या लाभार्थ्यांची संख्या
147- नवीन शिधापत्रिका, दुबार शिधापत्रिका
07 – राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य धनादेश वाटप
417 – डीबीटी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
21 – नवीन लाभार्थी यांचे अर्ज भरुन घेण्यात आले.06 – नवीन मतदारांकडून नमुना 6 भरुन घेण्यात आला. 02 – स्थलांतरीत मतदारांकडून नमुना 8 भरुन घेण्यात आला.
919 – उत्पन्नाचे दाखले वितरण,527 – राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र वितरण,52 – रहिवासी प्रमाणपत्र वितरण,41 – जातीचे दाखले वितरण,70 – आधार नोंदणी,121 – आधार दुरुस्ती,04 – आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र
76- उन्नत गटात न मोडत असलेले प्रमाणपत्र
04 – नविन आधार संचाचे वाटप,05 – नैसर्गिक आपत्र्त्तात पशुहानी झालेले लाभार्थी
01 – नैर्सार्गक आपर्तीत मयत व्यक्तीस 400000/- लाभ,28 – प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना,02 – आयुष्यमान कार्ड नगरपालिका 07 – बांधकाम परवानगी वाटप 06 – प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत चावी वाटप (गृहप्रवेश)
02 – लाड पागे समिती अंतर्गत नेमणुक आदेश,250 – दिन दयाळ अंत्योदय योजने अंतर्गत महिला बचत गटांतील महिलांना व्यवसायासाठी कर्जवाटप
महकार विभाग अमळनेर,12 – केंद्र पुरस्कृत प्राथमिक कृर्षी पतपुरवठा सहकारी संस्थांच्या संगणकीगण प्रकल्या अंतर्गत CSC सेंटर वाटप 12- सोलर रुफ टॉप योजना
कृषी विभाग अमळनेर 03 – टॅक्टर चावीचे वाटप,02 – कुट्टो मशिन,04 – रोटाव्हेटर
12 – फवारणी पंप,एकात्मीक बाल विकास सेवा योजना अमळनेर,02 माझी कन्या भाग्यश्री योजना
सदर शिबीरात अंदाजे 1100 ने 1200 लोकांनी उपस्थिती नोंदवून समाधान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्री. रुपेशकुमार सुराणा, तहसिलदार अमळनेर यांनी सदर कार्यक्रमाची प्रस्तावना केली. तसेच श्री.डी.ए. धनगर, उपशिक्षक सानेगुरजी माध्यमक विद्यालय, अमळनेर यांनी सूत्रसंचालन केले व श्री सी.यु. पाटील, निवासी नायब तहसिलदार यांनी उपस्थितांचे आभार मानले.






