फार्मसी महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिवस उत्साहात साजरा*
![]()
*फार्मसी महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिवस उत्साहात साजरा*
अमळनेर प्रतिनिधी
खान्देश शिक्षण मंडळ संचलित
स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी आणि स्व. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी, अमळनेर व जीवनश्री ब्लड सेंटर व जीवन ज्योती ब्लड सेंटर अमळनेर, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फार्मासिस्ट दिवसाचे औचित्य साधून ‘भव्य रक्तदान शिबीर’ आयोजित करण्यात आले या उपक्रमास महाविद्यालयातील सर्व रक्तदात्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.प्रा.देवेश भावसार, प्रा.अनिल बोरसे, श्री.किशोर बुलके, श्री.विनय ब्रम्हे आणि सर्व पदवी, पदविका विभागातील विद्यार्थ्यांकडून विविध रक्तगट असणाऱ्या सुमारे २८ बाटल्या रक्त संकलीत करण्यात आले.
त्याप्रमाणेच महाविद्यालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांकडून उत्तम व सुबक असे आजच्या काळातील फार्मासिस्ट चे महत्त्व दर्शविण्यात आले. विजयी विद्यार्थ्यांचा पारितोषिक प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला.
सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा.गितांजली पाटील,प्रा.स्वप्नाली महाजन,प्रा.छाया महाजन, प्रा.हर्षदा पवार, प्रा.प्रियंका महाजन, प्रा.मानसी उपासनी, प्रा.शिवानी शर्मा, प्रा.वैशाली कुलकर्णी,सौ.कविता शिंपी तसेच श्री.अनिल महाजन,श्री.सुजित अमळकर, श्री.ज्ञानेश्वर चौधरी, श्री.जितेंद्र पाटील, श्री.जगदीश सोनवणे, श्री.पंकज पवार, श्री.प्रकाश पाटील, श्री.महेश सोनजे, श्री.अतुल पाटील, श्री.कैलास कड व यश शिंपी यांनी सर्व उपक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले
खा.शि मंडळाचे विद्यमान कार्याध्यक्ष डाॅ.संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष सीए.निरज अग्रवाल, फार्मसी विभागाचे चेअरमन श्री योगेश मुंदडे, विद्यमान संचालक श्री. प्रदिप अग्रवाल, श्री. आण्णासाो हरी भिका वाणी, डॉ. अनिल शिन्दे, सचिव प्रा.पराग पाटील, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.हर्षवर्धन जाधव, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविन्द्र सोनवणे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पदविका व पदवी विभागातील सर्व विद्यार्थी यांचे या निमीत्ताने अभिनंदन करुन खान्देश शिक्षण मंडळाची गुणवत्तेची, सुस्कृंततेची व एकजूटतेची परंपरा यापढे अखंडीतपणे सुरु ठेवण्यासाठी शुभेच्छा दिल्यात.

