नवरात्री निमित्त ‘उलटी फिटिंग’ कार्यक्रमातून मंगरुळ (चोपडा) येथे समाज प्रबोधन.
1 min read

नवरात्री निमित्त ‘उलटी फिटिंग’ कार्यक्रमातून मंगरुळ (चोपडा) येथे समाज प्रबोधन.

Loading

नवरात्री निमित्त ‘उलटी फिटिंग’ कार्यक्रमातून मंगरुळ (चोपडा) येथे समाज प्रबोधन.

चोपडा : तालुक्यातील मंगरुळ येथे द्वारकाधीश मित्र मंडळाचे वतीने नवदुर्गा स्थापना करण्यात आली आहे. याठिकाणी अमळनेर येथील आर. बी. पाटील (कोकाकोला सर) यांचा ‘उलटी फिटिंग’¹ हा समाज प्रबोधन पर कार्यक्रम नुकताच दिनांक २५ सप्टेंबर रोजी रात्री पार पडला. मंगरुळ गावच्या सरपंच सौ. उज्वलाताई ठाकरे यांचे हस्ते नवदुर्गा पूजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम गावात वर्षानुवर्षे कष्ट करणाऱ्या ज्येष्ठ सालदाराचा सन्मान करुन कार्यक्रमास सुरुवात झाली.
विविध कलांच्या माध्यमातून कोकाकोलासर आपल्या वैचारिक पातळीने आबालवृद्ध, महिला, अंध, अपंग, विवाह पीडित यांच्या विविध प्रश्नांना हात घालून विनोदी स्वरूपात अहिराणी मायबोलीत समाज प्रबोधनाचे काम उलटी फिटिंग या कार्यक्रमांतर्गत करीत असतात आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून प्रेक्षकांशी नाळ जोडून ठेवतात. कार्यक्रमातून तीन ‘क’ व एक ‘ल’ हे समीकरण सांगत ‘परंपरा: काल आणि आज’ यावर उहापोह करत प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. कुटुंब पद्धती, अपत्य, फॅशन, विवाह, अवाजवी खर्च, आदी मुद्दे उदाहरणे देत समजून सांगितली. दरम्यानच्या काळात उपस्थित श्रोत्यांना प्रश्न विचारण्यात आले. योग्य उत्तर देणाऱ्यास बक्षीस देण्यात आले. विशेषतः लहान बालकांना चॉकलेट देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला.पाऊस झालेला असताना गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान बालकांनी हजेरी लावली होती.
कार्यक्रमासाठी मंगरुळ गावचे सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच तथा चोपडा सहकारी साखर कारखाना चे माजी चेअरमन अतुल भिमराव ठाकरे, सुदामराव ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार संजय सूर्यवंशी, बापूराव ठाकरे, दयाराम पाटील, मनोज ठाकरे, जितेंद्र ठाकरे, प्रणव ठाकरे, द्वारकाधीश मित्र मंडळाचे अध्यक्ष विराज ठाकरे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी द्वारकाधीश मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी परिश्रम घेतले. यापुढेही असेच समाज प्रबोधन होत राहावे अशी अपेक्षा गावकऱ्यांनी बोलून दाखवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *