पी आय दुर्गेश तिवारी यांचा सेवानिवृत्ताने पोलीस पाटील संघा तर्फे सत्कार
![]()
पी आय दुर्गेश तिवारी यांचा सेवानिवृत्ताने पोलीस पाटील संघा तर्फे सत्कार
शिंदखेडा तालुका पोलीस पाटील संघातर्फे पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशनचे पी आय दुर्गेश तिवारी यांचा सेवानिवृत्त निमित्ताने शिंदखेडा येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिंदखेडा पोलीस पाटील संघाचे माजी तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील उपस्थित होते यावेळी गणेश गिरासे यांनी आपल्या प्रास्ताविकात
पि आय दुर्गेश तिवारी यांनी शिंदखेडा व दोंडाईचा पोलीस स्टेशनला कार्यरत असताना अतिशय प्रामाणिक सेवा बजावून तालुक्यातील जनतेला न्याय देण्याचे कार्य केले सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेत सोडवण्यासाठी प्रयत्न केले तसेच पोलीस स्टेशनमध्ये आलेले कौटुंबिक नवरा बायको यांच्या एकमेकाविषयी आलेल्या तक्रारी समजून ते सामज्जेसपणे मिटुन दुभंगलेले संसार जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करूण अनेकाचे संसाराचे वेल
फुलवून त्यांचा संसार उभा करून आदर्श घडूवुन दिला तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुण अनाथ विद्यार्थ्यांना दिवाळी दसऱ्यात नवे कपडे व मिस्ट अन्न खाऊ घालून त्यांचे चेहऱ्यावर आनंद फुलवि विन्याचे महत्वाचे कार्य केले यामुळेच ते एक खाकी वर्दीतील देव माणूस म्हणून सेवा बजावताना समाजकार्य करून घेत होते एक शिस्तप्रिय अधिकारी बरोबर त्यांनी तालुक्यातील गुंडगिरी अविद्यधंदे चोरी गुटखा व वाढती गुन्हेगारी यावर अंकुश ठेवून आपला धबधबा निर्माण करून कायद्याच्या धाक दाखवून अनेक गुन्हे उघडकीस आणले त्याचबरोबर पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या समस्या जाणून घेऊन पोलीस पाटील व पोलीस कर्मचारी यांच्याशी असलेला जिव्हाळा त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील होते त्यामुळेच ते तालुक्यात जास्त काळ टिकून राहिले यावेळी पिंपळगाव बसवंत चे सेवानिवृत्त पीआय दुर्गेश तिवारी यांचा शाल श्रीफळ तसेच भेटवस्तू देऊन त्यांच्या सेवानिवृत्त निमित्त सत्कार करण्यात आला यावेळी भैय्यासाहेब नगराळे युवराज माळी प्रदीप गिरासे सुरेश पाटील कृष्णा करण काळ चंद्रकांत पाटील गणेश गिरासे समाधान गिरासे भाऊ परदेशी छगन बैसाणे यावेळी उपस्थित होते

