शासन व सामाजिक संस्थानाचा समन्वय – ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत जिरायत पाडा येथे भव्य आरोग्य शिबिर व जनजागृती रॅली संपन्न
1 min read

शासन व सामाजिक संस्थानाचा समन्वय – ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत जिरायत पाडा येथे भव्य आरोग्य शिबिर व जनजागृती रॅली संपन्न

Loading

शासन व सामाजिक संस्थानाचा समन्वय – ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत जिरायत पाडा येथे भव्य आरोग्य शिबिर व जनजागृती रॅली संपन्न

जळगाव प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र वैजापूर यांच्या वतीने जिरायत पाडा या गावात दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी भव्य आरोग्य शिबिराचे व आरोग्य जनजागृती रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहभागातून सकाळी ९.०० वाजता आरोग्य जनजागृती रॅली काढून गावात आरोग्य विषयक संदेश देण्यात आले . यामध्ये अभियानांतर्गत महिलांच्या आरोग्य तपासण्या, रक्तदाब, हिमोग्लोबिन, संस्थात्मक प्रसुती, कुटुंब नियोजन,पोषण आहाराबद्दल मार्गदर्शन, किशोरवयीन मुलींना मासिक पाळी स्वच्छता, बालविवाहाचे दुष्परिणाम व तंबाखू मुक्त यावर देखील सखोल माहिती देण्यात आली. व रॅली नंतर संभाषणात गावात आरोग्य विषयक जनजागृतीचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यात यश आले तसेच या उपक्रमामुळे शिबिरासाठी महिलांनी व गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.

सदर कार्यक्रमासाठी जपायगो व आधार बहुउद्देशीय संस्था यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. यावेळी जपायगो सामाजिक संस्थेच्या कार्यक्रम अधिकारी आम्रपाली मॅडम, आधार संस्थेचे दीपक संदनशिव सर, जि . प. शाळेचे शिक्षक बिलदार पावरा तसेच कर्जाने आरोग्य उपकेंद्राचे डॉ. शोएब सर, आरोग्य सेविका देवरे मॅडम, आरोग्य सहाय्यक नवाज तडवी, आरोग्य साहाय्यिका वर्षा बारेला, गट प्रवर्तक वंदना पाटील, आशा सेविका सरिता पावरा इ. आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून, गावकऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यशस्वी आयोजनाबद्दल सर्व सहभागी संस्था, अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले. या वेळी आधार संस्थेचे ज्ञानेश्वर सोनवणे, निशांत कोळी, प्रीती बारेला व लेनिन महाजन, शिवा बारेला तसेच बालविवाह मुक्त अभियानाचे कार्यक्रमाचे तालुका समन्वयक मोहिनी अहिरे मॅडम व तंबाखू मुक्त अभियानाचे समन्वयक समाधान अहिरे आदी कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *