आर.सी.पटेल आय.एम.आर.डी. परिसंस्थेत बीसीए साठी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२५ स्पर्धा संपन्न्
![]()
आर.सी.पटेल आय.एम.आर.डी. परिसंस्थेत बीसीए साठी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२५ स्पर्धा संपन्न्
शिरपूर प्रतिनिधी:
(वेदांत माळी)
(गौरव पाटील)
शिरपूर- इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च ॲड डेव्हलपमेंट येथे नुकतेच स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२५ या स्पर्धेचे आयोजन १३ सप्टेंबर २०२५ रोजी पार पडली.
या स्पर्धेचे प्राथमिक उद्दिष्ट विदयार्थ्यांमध्ये संशोधन सर्जनशीलता वाढवणे आणि त्यांना जागतिक दृष्टीकोण व आधुनिक ए.आय. तंत्रज्ञान व संगणक क्षेत्रामधील तंत्रज्ञानाशी अवगत करुन देणे हे होते. सदर स्पर्धेद्वारे विदयार्थ्यांचा नाविन्यपुर्ण विकास करण्यास व त्यांच्या कलागुणांचा विकास करण्यास मदत होते व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते .
या स्पर्धेचे उदघाटन परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली बी.पाटील तसेच प्रमुख अतिथी श्री. राजीव पाटील(प्रोग्रॅम मॅनेजर कॅपजेमिनी ,मुंबई ) यांच्या हस्ते करण्यात आले होते. आदरणीय संचालिका मॅडम यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला व त्यांच्या उपस्थितीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या औद्योगिक अनुभवाची माहिती दिली आणि स्पर्धेचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमास डॉ. वैशाली पाटील, डॉ. मनोज बहेरे, डॉ. तुषार पटेल आणि डॉ. मनोज पटेल या मान्यवरांचीही उपस्थिती होती.
या स्पर्धेत एकूण २२ संघाअंतर्गंत १३२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला , ज्यामध्ये प्रत्येक संघात ६ विद्यार्थी होते. विद्यार्थ्यांनी हेल्थकेअर, शेती, स्मार्ट सिटी आणि शिक्षण अशा विविध विषयांवर आधारित समस्या सोडवण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय मांडले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री. राजीव पाटील तसेच डॉ .अमित पाटील (असिस्टंट प्रोफेसर ,आर .सी. पटेल आय एम आर डी ,शिरपूर ) यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी सामूहिक सादर केलेल्या प्रेझेंटेशनचे मुल्यमापन केले आणि त्यातून १० ग्रुप्स ला स्टार परफॉर्मर म्हणून निवडण्यात आले . त्यात सायलेंट हस्टर्स (गांगुर्डे रागिणी गोविंद), टेक फोनिक्स (पाटील गीतेश्वरी राजेंद्र), व्यूअस्त्र रोबोटिक्स (भोई पियुष वासुदेव), व्हिजन (पाटील संकेत महेंद्र ), लाईफलाईन क्रिव्ह(विंचूरकर अनुष्का कुणाल), कृषींनोवा (पटेल पूनम अजय ), स्काय२स्ट्रीट (तुलसाणी परेश हरेश ), कोड रेंजर (तेजस्वी रवींद्र महाजन ), ब्राइटनिंग १२(पाटील भावेश छोटू ) तसेच टीम रूरल एक्स (पवार क्रिश अतुल )यांना निवडण्यात आले.
ही स्पर्धा परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली बी.पाटील, एम.सी.ए विभागप्रमुख डॉ. मनोज बेहरे, आय.क्यु.ए.सी. विभागप्रमुख डॉ. मनोज पटेल व पदवी विभागप्रमुख डॉ.तुषार पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पाडली. हया स्पर्धेचे नियोजन स्पर्धा को-ऑर्डिनेटर डॉ .आशा पाटील यांनी केले. तसेच प्रा. डॉ . डी . एम .मराठे , प्रा . विनोद महाजन ,प्रा . प्रियंका सैंदाणे ,प्रा . ज्योत्सना माळी आणि प्रा . विजेता सोनगिरे यांनी परिश्रम घेतले.




Thank you for appreciation