मारवड येथे शाळेतून बदलीने कार्यमुक्त शिक्षकांना भावपूर्ण निरोप व नविन हजर झालेल्या शिक्षकांचे सहर्ष स्वागत असा भावस्पर्शी कार्यक्रम संपन्न
1 min read

मारवड येथे शाळेतून बदलीने कार्यमुक्त शिक्षकांना भावपूर्ण निरोप व नविन हजर झालेल्या शिक्षकांचे सहर्ष स्वागत असा भावस्पर्शी कार्यक्रम संपन्न

Loading

मारवड येथे शाळेतून बदलीने कार्यमुक्त शिक्षकांना भावपूर्ण निरोप व नविन हजर झालेल्या शिक्षकांचे सहर्ष स्वागत असा भावस्पर्शी कार्यक्रम संपन्न…

शा.व्य.समिती मारवड कन्या यांच्या पुढाकारातून मारवड ग्रामस्थांतर्फे भारतीय संस्कृतीचे द्योतक सहृदय सोहळ्याचे आयोजन…

निरोपार्थी शिक्षक- (मारवड कन्या) मनिषा निकम, दिनेश मोरे व शारदा जाधव
(मारवड बॉईज) स्वाती पाटील, सारिका काटके, गणेश चव्हाण व श्याम वाघ

स्वागतार्थी शिक्षक- (मारवड कन्या) दत्तात्रय सोनवणे, चेतना बिऱ्हाडे व सुधीर पाटील
(मारवड बॉईज) महेश बोरसे, गिरीष पाटील व सविता पाटील

शनिवार, दि.20-09-2025 रोजी शा.व्य.समिती मारवड कन्या, ग्रामपंचायत मारवड व मारवड विकास मंच यांचेमार्फत बदली झालेल्या सर्व शिक्षकांना भावपूर्ण निरोप व नवीन आलेल्या शिक्षकांचा यथोचित स्वागत व सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मारवड गावच्या लोकनियुक्त सरपंच आशाबाई पवार व प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, केंद्रप्रमुख अशोक सोनवणे, उपसरपंच भिकनराव पाटील, ग्रा.पं.सदस्या उज्वला पाटील, कविता चौधरी, निवृत्त प्राचार्य एल.जी.चौधरी, मारवड विकासमंचचे अध्यक्ष राकेश गुरव, उपाध्यक्ष गोकुळ साळुंखे, महेश साळुंखे हे उपस्थित होते.
सर्वप्रथम प्रमुख अतिथींचे स्वागत करुन ऑनलाईन जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेमुळे गावातील दोन्ही शाळांचे कार्यमुक्त झालेल्या निरोपार्थी शिक्षकांचा त्यांच्या कार्याची खरी पावती म्हणून तसेच बदलीने नवीन हजर झालेल्या स्वागतार्थी शिक्षकांचा प्रोत्साहन म्हणून यथोचित स्वागत-गौरव करण्यात आला. कार्यक्रमास शा.व्य.समिती अध्यक्ष श्रीकांत पाटील, उपाध्यक्ष शेखर पाटील, सदस्य सदगुरु कोळी, चेतन चव्हाण, किरण पारधी, कविता साळुंखे, सुनिता पाटील, छाया पाटील, ज्योती पवार, शारदा बडगुजर, सुभाष पवार, निंबाजी पाटील, सुभाष पाटील, रुपेश साळुंखे, अरुणकुमार साळुंखे, प्रभाकर पानपाटील, उमेश चौधरी, मंगलबाई साळुंखे, रोहित साळुंखे, उमेश चौधरी, गोपाल बडगुजर, अशोक कोळी, निलेश बोरसे, समाधान शिंदे, किशोर पाटील, पुष्पाबाई पाटील, सुदीप साळुंखे, विलास पाटील, बशीर शेख, संजय पवार, अमोल पाटील, नामदेव पाटील, शितल चव्हाण दोन्ही शाळांतील आजी-माजी विद्यार्थी तसेच मारवड, बोरगाव, गोवर्धन गावातील पालक व मारवड विकास मंचचे सदस्य आदी बहुसंख्येने उपस्थित होते.
विद्यार्थी मनोगतात जान्हवी साळुंखे व दिव्याणी साळुंखे या माजी विद्यार्थीनींनी व शिक्षक मनोगतात गणेश चव्हाण व दिनेश मोरे निरोपार्थी शिक्षकांनी तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य एल.जी.चौधरी यांनी मारवड कन्या शाळेने लोकसहभागातून गुणवत्तापूर्ण भौतिक सुविधा जसे डिजीटल क्लास, परिपाठ मंच, इंटरनेट सुविधा, CCTV कॅमेरा, परसबाग, बाला उपक्रम, हँडवॉश स्टेशन, पुस्तकालय, स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक सहल, सांस्कृतिक कार्यक्रम असे अनेक उपक्रमांची माहिती देऊन निरोपार्थी व स्वागतार्थी यांच्या कार्याची ओळख आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारवड कन्या शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे, सूत्रसंचालन सुधीर पाटील व आभार प्रदर्शन गिरीष पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मारवड कन्याशाळेचे smc अध्यक्ष श्रीकांत साळुंखे, उपाध्यक्ष शेखर पाटील, सदस्य सदगुरु कोळी, चेतन चव्हाण, बशीर शेख व युवा प्रशिक्षणार्थी सुदिप साळुंखे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *