जळगाव तालुका पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी अजित तडवी यांची नियुक्ती
![]()
जळगाव तालुका पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी अजित तडवी यांची नियुक्ती
जळगाव प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत शिक्षण विभागातील अधीक्षक व तत्सम सामान्य राज्यसेवा गड व या संवर्गातून उपशिक्षणाधिकारी व तत्सम गट व प्रशासन शाखा संवर्गात पदोन्नती देणे संदर्भ शासन निर्णय जारी करण्यात आला असून यात गेल्या अनेक वर्षापासून रिक्त असलेल्या जळगाव तालुका गटशिक्षणाधिकारी पदी अजित तडवी यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे या अगोदर ते याच विभागात शालेय पोषण आहार अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या पदोन्नती बद्दल विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

