पत्रकारांवरील गुंडांच्या हल्ल्याविरोधात अमळनेरमध्ये व्हाईस आँफ मिडीयाचा आक्रोश – सुरक्षेसाठी ठोस धोरणाची गरज , तहसीलदार यांना व्हाईस आँफ मिडीयाचे निवेदन
![]()
पत्रकारांवरील गुंडांच्या हल्ल्याविरोधात अमळनेरमध्ये व्हाईस आँफ मिडीयाचा आक्रोश – सुरक्षेसाठी ठोस धोरणाची गरज
तहसीलदार यांना व्हाईस आँफ मिडीयाचे
निवेदन
अमळनेर प्रतिनिधी.
त्र्यंबकेश्वर जि. नाशिक येथे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या योगेश खरे , अभिजीत सोनवणे आणि किरण ताजणे या पत्रकारांवर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी केलेल्या भीषण हल्ल्याचा अमळनेर (शाखा ) जि.जळगांव. आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना *व्हॉईस ऑफ मिडिया* तर्फे तीव्र निषेध करण्यात आला याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच तहसीलदारांना निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की पत्रकारांवरील वारंवार होणाऱ्या हल्या विषयी संघटनेतर्फे संताप व्यक्त करत दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी व्हाईस ऑफ मिडिया चे प्रदेश सरचिटणीस मा. दिगंबर महाले, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मिलिंद ठोके आणि जळगांव जिल्हाध्यक्ष कल्पेश महाले यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ठळकपणे मांडण्यात आला. त्यांनी स्पष्ट केले की पत्रकार समाजाचा कणा आहे सत्य आणि न्यायासाठी अहोरात्र काम करणाऱ्या पत्रकारांवर होत असलेले हल्ले ही लोकशाहीला काळीमा फासणारी बाब आहे पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही.दोषींवर या कायद्यान्वये तातडीने कडक कारवाई झाली पाहिजे, अन्यथा पत्रकारांच्या सुरक्षितेसाठी मोठा संघर्ष उभारण्यात येईल पत्रकारांवरील हल्ले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. अश्या प्रकारची निवेदने राज्यभर, देशपातळीवर देण्यात येत आहेत निवेदनात हल्लेखोरांना तातडीने अटक करून पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कठोर कारवाई करावी .राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना राबविण्यात याव्यात असे भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी शासनाने ठोस व कडक धोरण आखावे आधी मागण्यांचा समावेश आहे. याप्रसंगी अंमळनेर तालुका अध्यक्ष उमेश काटे, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष उमेश धनराळे जिल्हाध्यक्ष साप्ताहिक विंग संजय सूर्यवंशी जळगाव जिल्हा संघटक जयेश काटे, जळगाव जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बापूराव ठाकरे, तालुकाध्यक्ष साप्ताहिक विंग अजय भामरे ,शहराध्यक्ष जयवंत वानखेडे आणि तालुका उपाध्यक्ष गौतम बिराडे ,सचिव जितेंद्र पाटील, कोषाध्यक्ष रवींद्र मोरे विवेक अहिरराव ,धनंजय सोनार मिलिंद पाटील, सहसचिव ईश्वर महाजन, तालुका प्रसिद्ध प्रमुख दिनेश पालवे, विनोद कदम ,राहुल बहिरम, रजनीकांत पाटील,रवींद्र बोरसे, उमाकांत ठाकूर, कमलेश वानखेडे, मधुसूदन विसावे, सुखदेव ठाकूर, भाऊसाहेब देशमुख, शरद कुलकर्णी, किरण चव्हाण ,निरंजन पेंढारे ,दयाराम पाटील, भरत पाटील ,प्रकाश जैन, बी.एल. पाटील, रमण भदाणे,विशाल मैराळे ,प्रसाद जोशी, सोपान भवरे, दिनेश नाईक, संजय पाटील, जगदीश पाटील, चंद्रकांत निकम, भूषण महाले, शामकांत पाटील,अमित ललवाणी उपस्थित होते.

