“सौ. प्रमोदिनी विनोददादा पाटील यांची निंभोरा सरपंचपदी बिनविरोध निवड – सत्कार सोहळ्यात मान्यवरांचा गौरव व शुभेच्छांचा वर्षाव…!”
1 min read

“सौ. प्रमोदिनी विनोददादा पाटील यांची निंभोरा सरपंचपदी बिनविरोध निवड – सत्कार सोहळ्यात मान्यवरांचा गौरव व शुभेच्छांचा वर्षाव…!”

Loading

“सौ. प्रमोदिनी विनोददादा पाटील यांची निंभोरा सरपंचपदी बिनविरोध निवड – सत्कार सोहळ्यात मान्यवरांचा गौरव व शुभेच्छांचा वर्षाव…!”

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर तालुक्यातील निंभोरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. प्रमोदिनी विनोददादा पाटील यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली असून, त्यांच्या या निवडीमुळे गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. सामाजिक कार्याची आवड व लोकसहभागाची तयारी असलेल्या सौ. प्रमोदिनी पाटील यांच्या निवडीने ग्रामविकासाच्या कामांना नवी दिशा मिळणार आहे, अशी सर्वत्र चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर आयोजित सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक संघाचे माजी तालुकाध्यक्ष प्रकाश भिका पाटील (मुख्याध्यापक मंगरूळ), श्री भाऊसाहेब पाटील, सौ. शोभा पाटील, सौ. वैशाली भाऊसाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सौ. प्रमोदिनी पाटील यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कार सोहळ्यात बोलतांना मान्यवरांनी सौ. प्रमोदिनी पाटील यांच्या निवडीचे कौतुक करून, गावाच्या विकासात त्या निश्चितपणे मोलाचे योगदान देतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सौ. प्रमोदिनी विनोददादा पाटील यांनीही आपल्या मनोगतात ग्रामविकास, महिला सक्षमीकरण व सामाजिक कार्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आणि ग्रामस्थांच्या प्रेम व विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
निंभोरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी झालेली ही बिनविरोध निवड ही केवळ लोकशाहीची ताकदच नाही तर ग्रामस्थांच्या एकतेचे व विश्वासाचे प्रतीक असल्याचे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *