नवरात्र उत्सवात मा.नगरसेवक विक्रांत पाटील यांना आरतीचा मान व उत्साहपूर्ण सत्कार…!”
1 min read

नवरात्र उत्सवात मा.नगरसेवक विक्रांत पाटील यांना आरतीचा मान व उत्साहपूर्ण सत्कार…!”

Loading

“नवरात्र उत्सवात मा.नगरसेवक विक्रांत पाटील यांना आरतीचा मान व उत्साहपूर्ण सत्कार…!”

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर शहरातील माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते मा. विक्रांत पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. स्वप्ना पाटील हे सदैव सामाजिक कार्याला प्राधान्य देत समाजहितासाठी तत्पर असतात. सामाजिक कार्याची हीच निष्ठा व लोकसहभागामुळे गणपती उत्सवात तसेच नवरात्र महोत्सवात विविध मंडळांमध्ये त्यांना सहपत्नीक आरती करण्याचा सन्मान मिळतो.
यावर्षी नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या माळेला गोहिलनगर महिला नवरात्र उत्सव मंडळ तसेच आम्ललेश्वर नगर येथील बंगाली माता नवरात्र उत्सव मंडळात विक्रांत पाटील दाम्पत्याला देवी आरतीचा मान मिळाला. या प्रसंगी महिला मंडळाकडून त्यांचे मनःपूर्वक स्वागत व सत्कार करण्यात आला.
स्वागत स्वीकारल्यानंतर विक्रांत पाटील यांनी आपल्या भावनिक मनोगतात सांगितले – “देवी आरतीचा मान म्हणजे देवतेचे आशीर्वाद. हा गौरव आम्हाला सतत सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा देतो. उत्सवामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आम्ही ऋणी आहोत.”
अशा या सत्कारसोहळ्यामुळे नवरात्र उत्सवाचा माहोल आणखी पावन व उत्साही झाला. विक्रांत पाटील दाम्पत्याचा आरती मान हा समाजातील कार्यकर्त्यांना एक आदर्श ठरला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *