व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एक हृदयस्पर्शी “आजी- आजोबा दिवस” साजरा
![]()
*व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एक हृदयस्पर्शी “आजी- आजोबा दिवस” साजरा
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील दुर्गा फाउंडेशन संचलित कै. श्री दादासाहेब व्ही. एस.पवार. इंग्लिश मीडियम स्कूल येथे दि. 20/09/2025 शनिवार रोजी *Grand Parents Day* मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम म्हणजे विद्यार्थी आणि त्यांच्या आजी आजोबांसाठी एक अविस्मरणीय अनुभव होता. विद्यार्थ्यांवर भावनिक संस्कार याद्वारे झाले.आजी-आजोबांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती तसेच नियोजित कार्यक्रमास देखील सक्रिय उत्साहाने प्रतिसाद दिला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन मा. श्री उत्कर्ष पवार तसेच संस्थेच्या सचिव सौ. अलका पवार आणि उपाध्यक्ष मा. श्री उमाकांत पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीपूजन व दीप प्रज्वलन उपस्थित आजी-आजोबांच्या हस्ते करून करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सुरेल स्वागतगीत गायन करून उपस्थित आजी-आजोबा व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
लहान चिमुकल्यानी सुंदर अशा आजी-आजोबांसाठी असलेल्या गाण्यांवर नृत्य सादर केले.या कार्यक्रमाचे एक मुख्य आकर्षण म्हणजे प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांनी आजी आजोबा यांची आजच्या काळातील परिस्थितींवर एक खूपच भावनिक व सुंदर अशी नाटिका सादर केली ही नाटिका बघून उपस्थितांचे डोळे पाणावले.
कार्यक्रमात यानंतर शाळेत आजी आजोबांसाठी विविध मजेशीर व मनोरंजनात्मक असे खेळ आयोजित करण्यात आले होते. या सर्व खेळांचा आजी -आजोबांनी मनसोक्त आनंद घेतला त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचे हास्य उमटले होते.
आजी आजोबा हे प्रत्येक कुटुंबाचे आधारस्तंभ, परंपरेची पालन करणारे आहेत शाळेत आजी -आजोबा व नातवंडांनी हे विशेष बंधन साजरे केले.आजी आजोबांच्या चेहऱ्यावरील आनंद त्यांच्या भावनिक स्मितांसह हा कार्यक्रम खरंच संस्मरणीय बनला.
या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या प्राचार्या वर्षा सोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. शाळेतील सर्व शिक्षिका योगिता फालके, प्रतीक्षा पाटील, कविता पाटील, मनीषा सोनार,नीतू शेलकर, संगीता पाटील,रोशनी महाजन, मनिषा ठाकूर, प्रियंका महाले, जया परदेशी तसेच शिक्षकेतर कर्मचारी संगीता पाटील सविता चौधरी यांचे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमूल्य सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचा समारोप आजी-आजोबांनी दिलेल्या गोड व सकारात्मक प्रतिक्रियांनी झाला. ज्यामुळे प्रत्येकाला प्रेमळ आठवणी, त्यांचे आपल्या जीवनात महत्त्वाच्या भूमिकेबद्दल अधिक कौतुक केले.


