कल्याण येथे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा प्रचंड उत्साहात संपन्न.  कल्याण डोंबिवलीमधील खेळाडूंना विशेष प्रोत्साहन क्रीडा शिक्षकांना कायम सहकार्य राहील: क्रीडा उपायुक्त संजय जाधव यांचे प्रतिपादन.
1 min read

कल्याण येथे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा प्रचंड उत्साहात संपन्न. कल्याण डोंबिवलीमधील खेळाडूंना विशेष प्रोत्साहन क्रीडा शिक्षकांना कायम सहकार्य राहील: क्रीडा उपायुक्त संजय जाधव यांचे प्रतिपादन.

Loading

कल्याण येथे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा प्रचंड उत्साहात संपन्न.

कल्याण डोंबिवलीमधील खेळाडूंना विशेष प्रोत्साहन क्रीडा शिक्षकांना कायम सहकार्य राहील: क्रीडा उपायुक्त संजय जाधव यांचे प्रतिपादन.

ठाणे:कल्याण( मनिलाल शिंपी)कल्याण डोंबिवली महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा २०२५-२६ मार्गदर्शनाखाली रिटा मेमोरियल स्कूल कल्याण पश्चिम येथे आयोजित करण्यात आली होती.
या कुस्ती स्पर्धेसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिचे क्रीडा उपायुक्त श्री.संजय जाधव यांचा प्रमुख उपस्थितित, बी एन एन महाविद्यालयाचे क्रीडा चंद्रकांत म्हात्रे, क्रीडा पर्यवेक्षक श्री.प्रविण कांबळे, माजी नगरसेवक जयवंत भोईर, युवा सेना ठाणे जिल्हा सरचिटणीस वैभव भोईर रिटा मेमोरीयल स्कूलचा मुख्याध्यापिका सौ.इंदिरा नायर, प्रगती महाविद्यालयाच्या क्रीडा संचालक प्रा. लक्ष्मण इंगळे, क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक व पेंढारकर महाविद्यालयाचे क्रीडा संघटक प्रा. उदय नाईक, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांचा प्रमुख उपस्थितित कुस्ती स्पर्धा सुरू करण्यात आली.क्रीडा प्रसिद्धी प्रमुख श्री.मनिलाल शिंपी, कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन जितेंद्र पाटील, सतीश गोडे,जगदीश भगत, सतीश म्हात्रे, दयानंद घोडे (माजी सैनिक) श्री. दिनेश थळे( मुथा कॉलेज शिक्षक) तसेच तेजस भोईर, मनोज भोईर.
तसेच नेरूळकर कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक अनंत उतेकर, न्यू हायस्कूलचे योगेश सावंत, अक्षय टेंभे, लक्ष्मण इंगळे, श्री.प्रविण खाडे, अजय भोईर, सागर चौधरी, दीपाली बळखंडे, लक्ष्मी आर्जा,उपस्थित होते. कल्याण डोंबिवली जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत या २५० कुस्तीवीरांनी सहभाग घेतला होता ही स्पर्धा १४वर्षवयोगट,, १७ वर्ष वयोगट, व १९ वर्षाखालील वयोगटात, फ्रीस्टाईल मुले/ मुली व १७, १९ वर्षाखालील वयोगटात ग्रिको रोमन मुले या प्रकारात खेळवण्यात आली,
एवढा खुप जास्त मुलांचा सहभाग असतांना सुद्धा (खेळप्रमुख) सुभाष पंजे व संजय काळे यांच्या नेतृत्त्वाखाली कुस्ती स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मॉडेल कॉलेजचे क्रीडा संचालक प्रा.सुभाष पंजे, ज्येष्ठ क्रीडा संघटक व कॅप्टन ओक हायस्कूलचे क्रीडाशिक्षक संजय काळे यांनी खेळ प्रमुख म्हणून स्पर्धा यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. जिल्हास्तरीय समिती तज्ञ क्रीडा प्रतिनिधी श्री. कृष्णा माळी, सौ. रेणुका पिसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *