“गावासाठी समर्पित वैद्यकीय सेवा – डॉ. कपिल महाजन यांचा एक वर्षाचा प्रेरणादायी प्रवास”
1 min read

“गावासाठी समर्पित वैद्यकीय सेवा – डॉ. कपिल महाजन यांचा एक वर्षाचा प्रेरणादायी प्रवास”

Loading

“गावासाठी समर्पित वैद्यकीय सेवा – डॉ. कपिल महाजन यांचा एक वर्षाचा प्रेरणादायी प्रवास”

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) –
कळमसरे नगरीत वैद्यकिय सेवा क्षेत्रात नवीन पर्व सुरू करताना, डॉ. कपिल मोतीलाल महाजन यांनी त्यांच्या वडिल, परम् आदर्श श्री. डॉ. मोतीलाल तोताराम महाजन यांचा वैद्यकीय वारसा पुढे नेण्याचा निर्धार केला. वैद्यक शास्त्राचे शिक्षण पूर्ण करून, त्यांनी दि. 22 सप्टेंबर 2024 रोजी गुरुकृपा क्लिनिक सुरू केले. या क्लिनिकच्या माध्यमातून त्यांनी आपल्या गाव व परिसरातील गरजू रुग्णांना तातडीची आणि उच्च दर्जाची वैद्यकिय सेवा देण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सेवा सुरू केली.
आज त्यांच्या या सेवेला एक वर्ष पूर्ण झाले असून, डॉ. महाजन यांनी या काळात गाव व परिसरातील रुग्णसेवेत कोणताही भेदभाव न करता, गरीब व श्रीमंत सर्व रुग्णांना समान सेवा दिली. त्यांनी रात्रंदिवस आपल्या कर्तव्यासाठी समर्पित राहून रुग्णांची काळजी घेतली, ज्यामुळे गावातील लोकांना त्यांची सेवा फार महत्त्वाची वाटली.
डॉ. महाजन यांनी या वर्षभरात मिळालेल्या सहकार्याबद्दल ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामविस्तार अधिकारी व सर्व सभासदांचे हृदयपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, “गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी योग्य जागा मिळाल्यामुळे रुग्ण सेवा अधिक सुकर झाली. भविष्यातही मी उत्कृष्ठ वैद्यकीय सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहीन.”
डॉ. कपिल महाजन यांच्या या भगिरथ सेवेला गाव व परिसरातील लोकांचा अमूल्य पाठिंबा लाभला असून, त्यांनी आपल्या कार्यात सुधारणा करण्यासाठी लोकांचे मार्गदर्शन व प्रेरणा स्वीकारण्याची तयारी व्यक्त केली आहे.

आपलाच रुग्ण सेवक:
डॉ. कपिल मोतीलाल महाजन, कळमसरे

काही मागच्या वर्षाची क्षणचित्रे..

One thought on ““गावासाठी समर्पित वैद्यकीय सेवा – डॉ. कपिल महाजन यांचा एक वर्षाचा प्रेरणादायी प्रवास”

  1. अशाच समाज सेवक वडीलांच्या पाऊलवर पाऊल ठेवणाऱ्या डॉक्टरांची आज गरज आहे. त्यासाठी मोठे व निस्वार्थी हृदय असावे लागते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *