प्रताप महाविद्यालयात ‘मोबाईल ऍप’ चे उदघाटन*
1 min read

प्रताप महाविद्यालयात ‘मोबाईल ऍप’ चे उदघाटन*

Loading

*प्रताप महाविद्यालयात ‘मोबाईल ऍप’ चे उदघाटन*
——————————————–
अमळनेर : प्रताप महाविद्यालय ( स्वायत्त ) येथे विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल असे ‘मोबाईल ऍप चे’ उद्घाटन दिनांक १८ सप्टेंबर रोजी महविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. हर्षवर्धन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी सॉफ्टवेअर कंपनीचे प्रतिनिधी राहुल शिंदे, IQAC समन्वयक डॉ. मुकेश भोळे, परीक्षा नियंत्रक प्रा. शशिकांत जोशी , परीक्षा समितीतील सदस्य प्रा.अमोल मानके ,प्रा.एस डी बागूल, प्रा.किरण गावित, प्रा.योगेश तोरवणे ,योगेश बोरसे, अजय साटोटे, नितीन राजपुत,रोहित ठाकूर आदी उपस्थित होते.
प्रस्तुत उद्घाटन प्रसंगी सॉफ्टवेअर कंपनी च्या प्रतिनिधींनी MKCL द्वारे तयार करण्यात आलेल्या *स्टूडंट ऍप* बद्दल माहिती दिली.सदरहू student app मधून विद्यार्थ्यांना तासिका, अभ्यासक्रम, परीक्षे संबंधी तसेच महाविद्यालयातील इतर कार्यक्रमांबद्दल माहिती उपलब्ध होईल,अशा प्रकारचे आधुनिक व शैक्षणिक दृष्टीने उपयुक्त मोबाईल ऍप लवकरच विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आश्वासन यावेळी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *