कै.धोंडू एन.ठाकरे कनिष्ठ महाविद्यालय, व के.आर.मालदे स्कूलचे कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश.  “जीत सुनिल भोईर,हर्षद प्रवीण चौधरी व ओम चौधरी यांची तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत विजयी सलामी.
1 min read

कै.धोंडू एन.ठाकरे कनिष्ठ महाविद्यालय, व के.आर.मालदे स्कूलचे कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश. “जीत सुनिल भोईर,हर्षद प्रवीण चौधरी व ओम चौधरी यांची तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत विजयी सलामी.

Loading

 

कै.धोंडू एन.ठाकरे कनिष्ठ महाविद्यालय, व के.आर.मालदे स्कूलचे कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश.

“जीत सुनिल भोईर,हर्षद प्रवीण चौधरी व ओम चौधरी यांची तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत विजयी सलामी.

ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)भिवंडी तालुकास्तरीय शासकीय शालेय कुस्ती स्पर्धा दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी कलानिकेतन व्यायाम शाळा कोन येथे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत रांजनोली येथील
कै.धोंडू एन.ठाकरे कनिष्ठ महाविद्यालयाचे कुस्ती वीर जीत सुनिल भोईर (६३kg) व हर्षद प्रवीण चौधरी (६७kg) यांनी तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांकाने यश संपादन केले आहे. त्याबद्दल संस्थापक अध्यक्ष करसन ठाकरे,प्राचार्य सचिन ठाकरे, प्राचार्य गोरक्षनाथ तरे, प्रा. हर्षद शेटे, प्रा. दयानंद कांबळे, प्रा. आर. आर. कसबे, प्रा. मयुरेश दळवी,प्रा.मनिषा यादव, प्रा.ऐश्वर्या चव्हाण,यांच्यासह विशाल सर,सौ.सोनाली पवार,स्वाती भोईर,विनायक ढोबळे यांनी अभिनंदन केले आहे.तसेच महाविद्यालयाचे स्पोर्ट्स डायरेक्टर डॉ.मनिलाल शिंपी यांच्या मेहनतीमुळे आपल्या कॉलेज ला हे यश मिळाले आहे अशा शब्दात महाविद्यालयाचे एडमिन श्री. रुपेश तरे यांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे.
भिवंडी तालुकास्तरीय शासकीय शालेय कुस्ती स्पर्धा 2025 दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी कलानिकेतन व्यायाम शाळा कोन येथे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन 14 वर्षे 17 वर्षे व 19 वर्ष मुला मुलींच्या वयोगटांमध्ये झाले आहेतएकूण 171 विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या स्पर्धेतून 14,17,19 वयोगटातील प्रत्येक प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी ठाणे जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
कुस्तीस्पर्धेसाठी पंच म्हणून श्रीराम पाटील, युवराज पाटील,गणेश पाटील,सतीश म्हात्रे,प्रज्ज्वल ढोणे,सुभाष ढोणे,राजेंद्र पाटील महेंद्र जाधव,किसन भोईर जयनाथ पाटील यांनी विशेष कार्य केले.सदर स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी ग्रामपंचायत कोणचे सरपंच रेखा पाटील, महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद ते खजिनदार सुरेश दादा पाटील ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथील राज्य क्रीडा मार्गदर्शक समीर सूर्यवंशी, पंचप्रमुख राष्ट्रीय पंच श्रीराम पाटील यांच्या उपस्थितीत स्पर्धा संपन्न झाल्या. सर्व मान्यवरांनी त्यांना पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन क्रीडा केंद्रप्रमुख यांनी स्पर्धेत प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *