समर्पित भावनेने बालचिकित्सक म्हणून डॉ. राजीव हिरवे यांनी ख्याती मिळवली  ,दीर्घ अनुभव व निरीक्षणाच्या जोरावर रुग्णसेवेला वाहून घेतलेले जीवन; डॉ. रवींद्र भोळे यांचे गौरवोद्गार
1 min read

समर्पित भावनेने बालचिकित्सक म्हणून डॉ. राजीव हिरवे यांनी ख्याती मिळवली ,दीर्घ अनुभव व निरीक्षणाच्या जोरावर रुग्णसेवेला वाहून घेतलेले जीवन; डॉ. रवींद्र भोळे यांचे गौरवोद्गार

Loading

समर्पित भावनेने बालचिकित्सक म्हणून डॉ. राजीव हिरवे यांनी ख्याती मिळवली

दीर्घ अनुभव व निरीक्षणाच्या जोरावर रुग्णसेवेला वाहून घेतलेले जीवन; डॉ. रवींद्र भोळे यांचे गौरवोद्गार

उरुळी कांचन प्रतिनिधी
वैद्यकीय क्षेत्रात औपचारिक शिक्षणासोबतच दीर्घकालीन अनुभव, निरीक्षण आणि रुग्णसेवेप्रती असलेली निष्ठा यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवंगत डॉ. राजीव हिरवे यांनी बालरोग चिकित्सक म्हणून प्रदीर्घ काळ रात्रंदिवस निष्ठेने आणि सेवाव्रती भावनेने वैद्यकीय सेवा बजावली. परिसरात बालरोग तज्ज्ञ म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या प्रदीर्घ अनुभव व सूक्ष्म निरीक्षणाच्या जोरावर त्यांनी समर्पित भावनेने बालचिकित्सक म्हणून ख्याती मिळवली, असे गौरवोद्गार डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक, ज्येष्ठ समाजसेवक व प्रवचनकार हभप डॉ. रवींद्र भोळे यांनी काढले.

दिवंगत डॉ. राजीव हिरवे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उरुळी कांचन येथील राम मंदिरात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. भोळे यांनी डॉ. हिरवे यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाचा तसेच त्यांच्या सेवाभावी वृत्तीचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

रुग्णसेवेला दिले सर्वोच्च प्राधान्य

डॉ. राजीव हिरवे यांनी बालरोग चिकित्सक म्हणून काम करताना रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले. बालरोग क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि प्रत्यक्ष निरीक्षणातून आलेले ज्ञान यामुळे परिसरातील अनेक रुग्णांना त्यांच्या सेवेचा लाभ मिळाला. त्यांच्या कार्याची आठवण उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.

मान्यवरांची उपस्थिती

या शोकसभेच्या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे पुणे प्रदेशाध्यक्ष देविदास भन्साळी, महात्मा गांधी सर्वोदय संघाचे सचिव सोपान कांचन, उरुळी कांचन पतसंस्थेचे सचिव अशोक सावंत, संचालक शिवाजी कांचन, सतीश जाधव तसेच डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशनचे सचिव शरद गोते यांनी केले, तर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. गणेश आखाडे यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी दिवंगत डॉ. राजीव हिरवे यांच्यासोबतच्या आठवणी, त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील कार्य आणि रुग्णांप्रती असलेली सेवाभावी भूमिका याविषयी मनोगत व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाला डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सन्माननीय सदस्य यांच्यासह डॉ. व्ही. ए. होन, डॉ. सुनील गांगुर्डे, डॉ. अनिल निगडे, डॉ. अमोल जेधे, डॉ. दत्तात्रय वाकसे, डॉ. राजेंद्र भोसले, डॉ. नितीन शिरोळे, डॉ. होरकाटे मॅडम, डॉ. संतोष राठोड, डॉ. संतोष कथले, डॉ. अभिजीत कदम, डॉ. थोरात मॅडम यांची उपस्थिती होती.

तसेच उरुळी कांचन परिसरातील ज्येष्ठ पत्रकार अमोलजी भोसले (दैनिक केसरी), सुपरफास्ट न्यूजच्या संपादिका सुवर्णाताई कांचन यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

पसायदानाने शोकसभेची सांगता

दिवंगत डॉ. राजीव हिरवे यांच्या स्मृतींना उजाळा देत उपस्थितांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. अखेरीस ज्येष्ठ समाजसेवक व प्रवचनकार हभप डॉ. रवींद्र भोळे यांनी पसायदान म्हटले आणि कार्यक्रमाची भावपूर्ण वातावरणात सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *