“अवयव स्वर्गात नव्हे, पृथ्वीवरच उपयुक्त – कांताबाई पहाडे यांचा परिवाराचा देहदानाचा प्रेरणादायी संकल्प”  “लायन्स क्लब उपक्रमातून अमळनेरला मिळाली मानवतेची नवी प्रेरणा”
1 min read

“अवयव स्वर्गात नव्हे, पृथ्वीवरच उपयुक्त – कांताबाई पहाडे यांचा परिवाराचा देहदानाचा प्रेरणादायी संकल्प” “लायन्स क्लब उपक्रमातून अमळनेरला मिळाली मानवतेची नवी प्रेरणा”

Loading

“अवयव स्वर्गात नव्हे, पृथ्वीवरच उपयुक्त – कांताबाई पहाडे यांचा परिवाराचा देहदानाचा प्रेरणादायी संकल्प”

“लायन्स क्लब उपक्रमातून अमळनेरला मिळाली मानवतेची नवी प्रेरणा”

अमळनेर :(महेंद्र पाटील)
“जग सोडून गेल्यानंतरही आपलं शरीर समाजासाठी उपयोगी पडू शकतं, हीच खरी मानवी सेवा आहे…” या भावनेला प्रत्यक्ष रूप देत पहाडे परिवाराने एक ऐतिहासिक व समाजप्रबोधन करणारा निर्णय घेतला आहे.

जागतिक अवयवदान दिनानिमित्त (१३ ऑगस्ट) लायन्स क्लब ऑफ अमळनेर तर्फे वर्षभर अवयवदान जनजागृती मोहीम राबवली जाते. याचाच भाग म्हणून लायन्स सदस्य महावीर पहाडे यांनी आपल्या मातोश्री श्रीमती कांताबाई रतनलालजी पहाडे यांचे दिनांक १६ सप्टेंबर रोजी रात्री १ वाजता निधन झाले.पहाडे यांच्या परीवाराने देहदानाचा समाजाभिमुख निर्णय आधीच जाहीर केला होता.त्यामुळे त्याचे पार्थिव शरीर भाऊसाहेब हिरे मेडिकल फाउंडेशन, धुळे येथे सुपूर्द करण्यात आले.

महावीर पहाडे यांनी भावनिक शब्दांत सांगितले की –
“अवयव स्वर्गात नेऊ नका, त्यांची खरी गरज इथेच आहे. कोणाचं जीवन वाचवणं हाच सर्वांत मोठा धर्म आहे. आईचं जीवन सेवा व त्यागाने परिपूर्ण होतं, त्याच पवित्र विचारांना पुढे नेत आम्ही हा निर्णय घेतला.”

ही मोहीम केवळ माहिती देण्यापुरती मर्यादित न राहता, अनेकांच्या अंतःकरणाला स्पर्शून गेली. अनेकांनी अवयवदानाची प्रतिज्ञा करून समाजासाठी योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली.त्यानंतर ॲम्बुलन्स द्वारे कर्मवीर भाऊसाहेब हिरे मेडिकल फाऊंडेशन, शासकीय महाविद्यालय,धुळे येथे देहदाना साठी पाठविण्यात आले.

लायन्स क्लबच्या या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक बदलाची नवी ज्योत पेटली आहे. कांताबाई पहाडे यांचे देहदान हे केवळ एक कर्तृत्ववान निर्णय नसून, मानवी मूल्यांचा दीपस्तंभ ठरला आहे. त्यांच्या या कार्यातून संपूर्ण समाजाला प्रेरणा मिळेल आणि भविष्यात अनेक जण अशाच प्रकारे अवयवदान व देहदान करण्यासाठी पुढे येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. संदीप जोशी, सचिव महेंद्र पाटील, खजिनदार नितीन विंचूरकर,प्रोजेक्ट चेअरमन महावीर पहाडे, डॉ. मिलिंद नवसारीकर,योगेश मुंदडा,निरज अग्रवाल, विनोद अग्रवाल, प्रशांत सिंघवी,प्रदीप जैन,यांनी भविष्यात जर कुणाला *अवयवदान* किंवा *देहदान* करायचे असल्यास लायन्स क्लब अमळनेर यांच्या पदाधिकारी यांच्याशि संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *