चांदसर आश्रमशाळेत शालेय व्यवस्थापन समिती कार्यशाळा संपन्न : बालसंरक्षण व पालक जनजागृतीला प्राधान्य
1 min read

चांदसर आश्रमशाळेत शालेय व्यवस्थापन समिती कार्यशाळा संपन्न : बालसंरक्षण व पालक जनजागृतीला प्राधान्य

Loading

 


चांदसर आश्रमशाळेत शालेय व्यवस्थापन समिती कार्यशाळा संपन्न : बालसंरक्षण व पालक जनजागृतीला प्राधान्य

चांदसर (ता. धरणगाव) प्रतिनिधी :
आज दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, चांदसर येथे शालेय व्यवस्थापन समितीची कार्यशाळा उत्साहात पार पडली.

या कार्यशाळेत सावित्रीबाई फुले महिला मंडळ संस्थेच्या मोबिलायझर सौ. मनीषा बैसाणे यांनी पालकांना प्रकल्पाची ओळख, पार्श्वभूमी, ध्येय व उद्देश स्पष्ट करून दिला. त्यांनी अधोरेखित केले की “बालसंरक्षण ही केवळ तात्पुरती गरज नसून मुलांच्या सशक्त व उज्वल भविष्यासाठीचा मजबूत पाया आहे.”

आदिवासी आश्रमशाळांमध्ये मुलांचे संरक्षण, कल्याण व विकासाला प्राधान्य देणारे सुरक्षित, बालमैत्रीपूर्ण वातावरण निर्मिती हे या उपक्रमाचे ध्येय असल्याचे सांगण्यात आले.

या कार्यक्रमास मुख्याध्यापक देशपांडे सर, अधीक्षक श्री. खराटे सर उपस्थित होते. त्यांनीही पालकांना शालेय व्यवस्थापन समितीचे महत्त्व समजावून दिले. शिक्षिका विद्या पाटील, शिक्षक मिलिंद महाले, बाळूसिंग पावरा, विशाल पाटील, अनिल कोळी, अजय तायडे, परेश चव्हाण, अविनाश साळुंखे, कु. प्रियंका बहिरम (ANM) तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी अधीक्षिका जाधव मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *