अमळनेर-साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये हिंदी दिवसानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन*
1 min read

अमळनेर-साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये हिंदी दिवसानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन*

Loading

*अमळनेर-साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये हिंदी दिवसानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन*

अमळनेर प्रतिनिधी
दिनांक 15 सप्टेंबर वार सोमवार रोजी साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये हिंदी दिवसानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सचिव माननीय दादासाहेब संदीपजी घोरपडे अध्यक्ष म्हणून लाभले होते . तसेच संस्थेचे जेष्ठ संचालक माननीय श्री आप्पासाहेब गुणवंतराव पाटील व माननीय श्री .आबासो भास्करराव बोरसे व प्रमुख पाहुणे म्हणून साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री .सुनील पाटील सर व परीक्षक म्हणून हिंदी विषयाचे शिक्षक श्री मनीष उघडे सर लाभले होते .व्यासपीठावरील मान्यवरांनी दीप प्रज्वलन व माल्यार्पण केले .व कार्यक्रमाचे प्रास्ताविक साने गुरुजी कन्या हायस्कूलचे शिक्षक श्री . दिलीप पाटील सर यांनी केले . वकृत्व स्पर्धेमध्ये एकूण 15 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला .श्री सुनील पाटील सर यांनी आपल्या भाषणात सांगितले की आज खरोखर हिंदी भाषा प्रत्येक क्षेत्रात दर्जेदार व संपन्न आहे .परीक्षक श्री मनीष उघडे सर यांनी हिंदी भाषेचा इतिहास सांगितला .अध्यक्षीय भाषणात श्री . माननीय दादासाहेब घोरपडे सर म्हणाले प्रत्येक भाषा श्रेष्ठ व दर्जेदार असतात म्हणून आपण प्रत्येक भाषेचा आदर व सन्मान केला पाहिजे . तरच खऱ्या अर्थाने आज आपण हिंदी दिवस साजरा केला हे सार्थक होईल . परीक्षेचा निकाल श्री मुकेश पाटील यांनी जाहीर केला .प्रथम महेश्वरी मनोहर पाटील , द्वितीय कल्याणी संदीप पाटील ,तृतीय नंदिनी संजीव पाटील ,उत्तेजनार्थ गायत्री धनराज बोरसे .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहावीच्या विद्यार्थिनी जयश्री सैंदाणे व भूमिका बहारे व आभार प्रणाली पाटील यांनी मांडले . कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री देशमुख सर ,श्री मुकेश पाटील , श्री महाजन सर , सौ . वैद्य मॅडम , साळुंखे सर , वंजारी मॅडम ,वानखेडे मॅडम यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *