प्रताप महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजी विभागातर्फे अतिथी व्याख्यानासोबत स्टुडंट यूनिट चे उद्घाटन व पोस्टर स्पर्धेचे आयोजन*
1 min read

प्रताप महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजी विभागातर्फे अतिथी व्याख्यानासोबत स्टुडंट यूनिट चे उद्घाटन व पोस्टर स्पर्धेचे आयोजन*

Loading

*प्रताप महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजी विभागातर्फे अतिथी व्याख्यानासोबत स्टुडंट यूनिट चे उद्घाटन व पोस्टर स्पर्धेचे आयोजन*
————————————————-

अमळनेर प्रतिनिधी – दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी प्रताप महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजी विभागातर्फे नरडाणा येथील Omsynth life sciences चे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.युवराज सातकर यांचे “Opportunities and challenges in entrepreneurship“ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.यावेळी मायक्रोबायोलॉजिस्टस सोसाइटी, इंडिया अंतर्गत विभागात स्टुडंट यूनिट चे उद्घाटन डॉ.सातकर सरांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रताप महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव यांनी भूषविले.विभागप्रमुख प्रा.शशिकांत जोशी यांनी प्रास्ताविक सादर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.हेमलता सूर्यवंशी -भोसले यांनी केले.प्रा.वैशाली महाजन यांनी अतिथींचा परिचय करून दिला. अतिथीपर भाषणात डॉ.सातकर यांनी विद्यार्थ्याना स्वतः उद्योजक बनण्यासाठी प्रेरित केले.आपल्या विषयाचा उपयोग करून नवीन व्यवसाय सुरू करताना येणाऱ्या अडचणींवर कशी मात करावी ? याविषयी उत्तम मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.यावेळी प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.हर्षवर्धन जाधव यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्रा.डॉ.डी.आर.चौधरी, केमिस्ट्री विभागातील प्राध्यापकवृंद , मायक्रोबायोलॉजी विभागातील प्राध्यापकवृंद ,पदवी व पदव्युत्तर वर्गाचे विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात “वेदिक मायक्रोबायोलॉजी”या विषयावर पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी परिक्षक म्हणून अर्जुन बायोलॉजी क्लासच्या संचालिका सौ.सोनल जोशी यांना आमंत्रित करण्यात आले.प्रा.भावना महाजन यांनी त्यांचा परिचय करून दिला व प्रा.वैशाली महाजन यांनी स्वागत केले.पोस्टर बनविण्याच्या व ते सादर करण्याच्या कलेचे सोनल मॅडम यांनी कौतुक केले.या प्रदर्शनास प्रभारी प्राचार्य डॉ.एच.डी.जाधव,डॉ.सातकर,माजी प्राचार्य डॉ.ए.बी.जैन,डॉ.धनंजय चौधरी ,प्रा.अवित पाटील डॉ.मुकेश भोळे,उपप्राचार्या डॉ.कल्पना पाटील यांनी उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी
मायक्रोबायोलॉजी विभागातील प्रा.आदित्य संकलेचा,प्रा.नेहा महाजन,प्रा.भावना महाजन,प्रा.केतकी सोनवणे,प्रा.कल्याणी शशिकांत पाटील,प्रा.नेहा पाटील,प्रा.कल्याणी जयेश पाटील,प्रा.औक्षणी साळुंखे तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री.विलास पाटील व श्री.किशोर सोनार यांचे सहकार्य लाभले.प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.हेमलता सूर्यवंशी यांनी केले तर प्रा.ममता महाजन यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *