अमळनेरमध्ये व्हॉइस ऑफ मीडिया केडर कॅम्पात बापूराव ठाकरे यांचे देशभक्तिपर गायन*
![]()
*अमळनेरमध्ये व्हॉइस ऑफ मीडिया केडर कॅम्पात बापूराव ठाकरे यांचे देशभक्तिपर गायन*
अमळनेर प्रतिनिधी
श्री मंगळ ग्रह संस्था येथे व्हॉइस ऑफ मीडिया तर्फे आयोजित करण्यात आलेल्या केडर कॅम्प कार्यक्रमात पत्रकार, शिक्षक तसेच गायक म्हणून आपली ओळख प्रस्थापित केलेले बापूराव ठाकरे यांनी सुरेल गायन सादर केले.
या प्रसंगी ठाकरे सरांनी १९७१ साली प्रदर्शित झालेल्या पूरब और पश्चिम चित्रपटातील गायक महेंद्र कपूर यांचे “भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ” हे देशभक्तिपर गीत सादर केले. कल्याण-आनंद यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि गीतकार इंदीवर लिखित या गीताच्या प्रभावी सादरीकरणामुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
देशभक्तीपर गीताच्या स्वरमाधुर्यामुळे सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाला शिक्षक, पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

