अमळनेर येथे नाट्य कार्यशाळेचे आयोजन महिला मंच व परिवर्तन जळगाव तर्फे आयोजन
![]()
अमळनेर येथे नाट्य कार्यशाळेचे आयोजन
महिला मंच व परिवर्तन जळगाव तर्फे आयोजन
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर महिला मंच ट्रस्ट व परिवर्तन जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 18 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2025 असे तीन दिवस “नाट्य प्रशिक्षण शिबीराचे आयोजन खास 20 ते 50 वयोगटातील महिलांसाठी करण्यात आलेले आहे.(विवाहित महिलांना प्राधान्यक्रम देण्यात येईल.) जुना टाऊन हॉल (व्हिक्टोरीया लायब्ररी) पू.साने गुरूजी वाचनालयाजवळ, अमळनेर येथे 11 ते 5 वाजेपर्यंत प्रशिक्षण शिबीर घेण्यात येईल.
परिवर्तन जळगाव चे अनुभवी व प्रसिद्ध रंगकर्मी या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. अमळनेर मधील महिलांसाठी ही मोठी संधी आहे.
नाटक , अभिनय व त्या अनुषंगाने सर्व बाबी या शिबिरात प्रात्यक्षिकांसह शिकवल्या जाणार आहेत .
या शिबीरासाठी नाममात्र फी आहे.या शिबिरासाठी फक्त 40 महिलांनाच संधी मिळेल. संख्या मर्यादित आहे. अमळनेर शहरातील रसिक महिला भगिनींनी नाट्य कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन अमळनेर महिला मंच ट्रस्ट व परिवर्तन जळगाव यांनी केले आहे. या कार्यशाळेसाठी पूज्य साने गुरुजी वाचनालयाचे सहकार्य लाभत आहे.

