प्रयोगातून विज्ञानाचा जादुई प्रवास – मिल के चलो असोसिएशनचा उपक्रम
![]()
प्रयोगातून विज्ञानाचा जादुई प्रवास – मिल के चलो असोसिएशनचा उपक्रम
अमळनेर प्रतिनिधी
मिल के चलो असोसिएशन यांचा ६ वा वर्धापनदिन दिन सोप्या प्रयोगातुन विज्ञान या विषयावर रॉयल उर्दू स्कुल, अमळनेर येथील शाळेत दि ९ सप्टेंबर २०२५ मंगळवार रोजी घेण्यात आले या सत्रात प्रा विनायक पाटील यांनी सोप्या साहित्यातील ९ प्रयोग घेतले, सत्रात इ ५ वी ते ९वी चे २१० विद्यार्थी हजर होते सत्राला मुलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, मुलांनी त्यांच्या मनातील अनेक प्रश्न विचारून सत्रातील रंजकता वाढवली, शिवाय या कार्यक्रमाला प्रताप महाविद्यालयातील नॅनो टेक्नॉलॉजी चे प्रा.डॉ.एस डी बागुल सर हे देखील पूर्ण वेळ उपस्थित होते, शिवाय शाळेच्या मुख्याध्यापिका खान मॅडम, इतर शिक्षक विज्ञान शिक्षक देखील पूर्ण वेळ उपस्थित होते, सत्राच्या शेवटी ६-७ विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या शेवटी त्याबद्दल ची प्रतिक्रिया दिली व विज्ञान शिक्षक नदीम सर आणि नावीद सर यांनी देखील कार्यक्रमाची प्रतिक्रिया देऊन पुढील भेटीचे आमंत्रण दिले व आभार मानले,
मुलांनी देखील पून्हा येण्यासाठी विनंती केली….

