कळमसरे येथील विजय व्यायाम शाळेसाठी नवीन इमारत उभारणीसाठी आमदार अनिल पाटील कडे निधीची मागणी
1 min read

कळमसरे येथील विजय व्यायाम शाळेसाठी नवीन इमारत उभारणीसाठी आमदार अनिल पाटील कडे निधीची मागणी

Loading

कळमसरे येथील विजय व्यायाम शाळेसाठी नवीन इमारत उभारणीसाठी आमदार अनिल पाटील कडे निधीची मागणी

अमळनेर प्रतिनिधी :
दिनांक 10 सप्टेंबर रोजी अमळनेरचे आमदार आदरणीय श्री. अनिल भाईदास पाटील यांना कळमसरे येथील रहिवासी हरिष परशराम मराठे व चिरंजीव कपील हरिष मराठे यांनी विजय व्यायाम शाळेसाठी नवीन इमारत उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे लेखी निवेदन सादर केले.
सुमारे तीस वर्षांपूर्वी तत्कालीन सरपंच मा. दोधू आधार चौधरी यांनी या व्यायाम शाळेसाठी 5900 फुट जागा उपलब्ध करून दिली होती. त्याचा अधिकृत उतारा देखील उपलब्ध असून, आता या जागेवर व्यायाम शाळेची सुसज्ज इमारत उभारण्यासाठी शासकीय निधीची गरज असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
याबाबत आमदार अनिल पाटील पाटील यांनी संबंधित मागणीचा गांभीर्याने विचार करून लवकरच निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *