पूर्वजांचे स्मरण म्हणजे संस्कारांचा वारसा जपणे” – पितृपक्षात पितृअष्टक पठणाचे  कृषीभूषण पाटील दाम्पत्याचे आवाहन
1 min read

पूर्वजांचे स्मरण म्हणजे संस्कारांचा वारसा जपणे” – पितृपक्षात पितृअष्टक पठणाचे  कृषीभूषण पाटील दाम्पत्याचे आवाहन

Loading

पूर्वजांचे स्मरण म्हणजे संस्कारांचा वारसा जपणे” – पितृपक्षात पितृअष्टक पठणाचे  कृषीभूषण पाटील दाम्पत्याचे आवाहन

अमळनेर प्रतिनिधी :
पितृपक्ष हा पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या स्मृतींना साष्टांग नमन करण्याचा पर्व मानला जातो. या पार्श्वभूमीवर कृषिभूषण मा. आमदार साहेबराव पाटील व मा. नगराध्यक्षा सौ. पुष्पलता पाटील यांनी समाजाला एक प्रेरणादायी संदेश दिला आहे.
“दररोज पितृअष्टकाचे ११ पाठ केल्याने पूर्वजांची कृपा लाभते आणि त्यांच्या आशीर्वादाने कुळाचा, समाजाचा आणि राष्ट्राचा विकास साधता येतो,” असे आवाहन पाटील दाम्पत्याने केले.
पितृअष्टकातील ओव्या पूर्वजांनी दिलेला वारसा, मार्गदर्शन आणि संस्कार यांचे भावपूर्ण स्मरण करून देतात. “सदा स्मृती राहो आपुलीच आम्हा… नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना” या ओवीतून कृतज्ञतेचा आणि आत्मिक शुद्धीचा संदेश मिळतो.
पितृपक्षात या अष्टक पठणाने समाजात श्रद्धा, संस्कार आणि कुटुंबबंधांची जपणूक व्हावी, हा पाटील दाम्पत्याचा उद्देश असून त्यांचा संदेश आजच्या पिढीला पूर्वजांविषयी आदरभाव आणि आध्यात्मिक प्रेरणा देणारा ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *