डॉ. (राव) पाईल्स स्पेशालिस्ट कडून रुग्णाची आर्थिक व मानसिक फसवणूक! जळगावात बनावट उपचारांच्या नावाखाली फसवणूक – जबाबदार कोण?
![]()
डॉ. (राव) पाईल्स स्पेशालिस्ट कडून रुग्णाची आर्थिक व मानसिक फसवणूक!
जळगावात बनावट उपचारांच्या नावाखाली फसवणूक – जबाबदार कोण?
जळगाव प्रतिनिधी
रुग्णांना दिलासा देण्याऐवजी स्वतःच्या खिशा भरण्याचे काम काही बनावट डॉक्टरांकडून केले जात असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.
शहरातील चित्रा चौक येथील डॉ. (राव) पाईल्स स्पेशालिस्ट या क्लिनिकमध्ये एका रुग्णाची थेट ११,०००/- रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.
पीडित रुग्णाने सांगितले की, “मला पाईल्सचा तीव्र त्रास होत होता. ऑपरेशनचा सल्ला देत डॉक्टरांनी माझ्याकडून ११ हजार रुपये रोख घेतले. मात्र पैसे घेतल्यानंतर डॉ. (राव) सरळ हैद्राबादला रवाना झाले. मी वारंवार क्लिनिकला गेलो, पण तिथे त्यांचा मुलगा डॉ. नरसिंहा वैद्यराज फक्त उद्या येतील, परवा येतील असे खोटे आश्वासन देत राहिला. अशा प्रकारे मला ८ ते १० दिवस फिरवून फसवले.”
रुग्णाला त्रास असह्य झाल्याने त्याने अखेर डॉ. पराग जहागिरदार यांच्याकडे ऑपरेशन करून घेतले. त्यानंतर परतावा मागितल्यावर डॉ. नरसिंहा वैद्यराज यांनी रुग्णाचा कॉल ब्लॅकलिस्टमध्ये टाकला. वारंवार विनवण्या करूनही पैसे परत केले नाहीत.
पीडित रुग्ण सध्या शस्त्रक्रियेनंतर बेडवर आहे व चालता-फिरता येत नसल्याचे सांगत आहे.
त्याने संबंधितांनी त्वरित याची नोंद घेऊन न्याय द्यावा, तसेच “अशा भोंदूगिरीमुळे इतर कोणत्याही रुग्णाची फसवणूक होऊ नये” अशी मागणी केली आहे.

