संविधान सन्मान संमेलनाची यशस्विता देशाला बळकट करेल- डॉ.अब्दुल करीम सालार
1 min read

संविधान सन्मान संमेलनाची यशस्विता देशाला बळकट करेल- डॉ.अब्दुल करीम सालार

Loading

*संविधान सन्मान संमेलनाची यशस्विता देशाला बळकट करेल*.
डॉ.अब्दुल करीम सालार

जळगांव प्रतिनिधी

विविध जाती, धर्म, भाषा, पंथ, विचार, राज्य आणि माणसं अशा साऱ्यांना एकत्रित ठेवून एकसंघ असणाऱ्या भारत देशाला जागतिक स्तरावर एक नवी ओळख संविधानानेच दिलेली असल्याने होऊ घातलेल्या संविधान सन्मान संमेलनाने देशाला निश्चितपणे बळ मिळेल असे मत स्वागताध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांनी संविधान संमेलनाच्या नियोजन बैठकी प्रसंगी बोलताना व्यक्त केले. अध्यक्षस्थानी संमेलनाचे संयोजक मुकुंद सपकाळे होते. प्रास्ताविक डॉ. मिलिंद बागुल यांनी तर भूमिका जयसिंग वाघ यांनी विशद केली. उद्योजक संजय इंगळे, चर्मकार महासंघाचे गणेश सुरवाडे, भगवान बाविस्कर, माजी नगरसेवक सुरेश सोनवणे एडवोकेट राजेश गोयर,मनोहर गाढे,भगवान बाविस्कर, हरिश्चंद्र सोनवणे, भारती रंधे, नीलू इंगळे,चेतन नन्नवरे, दिलीप सपकाळे यांनी संमेलन संदर्भात मार्गदर्शन केले.साहेबराव बागूल,प्रीतीलाल पवार, प्रा. किसन हिरोळे,दिनकर सोनवणे,सोमा भालेराव,सचिन बिऱ्हाडे,दत्तू सोनवणे, सुभाष सपकाळे,भीमराव अडकमोल,वाल्मीक जाधव, एडवोकेट अभिजीत रंधे,अनिल सुरडकर यांनी संमेलनाच्या नियोजनासंदर्भात सूचना केल्यात.पितांबर अहिरे,अशोक सपकाळे, ललित महिरे, चंदन बिऱ्हाडे, महेंद्र केदारे आनंद तायडे, बाळू ढिवरे, यशवंत घोडेश्वर, चेतन नन्नवरे गुलाब कांबळे, विनोद रंधे यांनी संमेलनात सहभागी होणाऱ्या मान्यवरांच्या सहभागाबद्दल व नियोजनाबद्दल माहिती सांगितली. सूत्रसंचालन बापूराव पानपाटील यांनी तर आभार जगदीश सपकाळे यांनी मानले बैठकीस बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *