सार्वजनिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा
![]()
सार्वजनिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा
जळगांव प्रतिनिधी
डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनिल महाजन यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला सचिव विलास चौधरी, मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल, पर्यवेक्षक लालसिंग पाटील व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची प्रतिकृती साकारलेल्या ओम कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. ओम कोळी ह्या विद्यार्थ्याने विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे असणारे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी,प्रगतीसाठी शिक्षक सतत प्रयत्नशील असतात त्या प्रयत्नाचं आपल्या जीवनासाठी योग्य उपयोग करून घेऊन विद्यार्थ्यांनी नावलौकिक प्राप्त करावा असे मत अध्यक्ष स्थानावरून अनिल महाजन यांनी व्यक्त केले. लक्ष्मी जयकर, आरजू पिंजारी, श्रुतिका सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले शुभांगिनी महाजन यांनी सूत्रसंचालन तर लक्ष्मण भुगवड्या यांनी आभार मानले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

