जुन्या शिक्षकांनी टीईटी बाबत अस्वस्थ होऊ नये-  शिक्षक भारती संघटना
1 min read

जुन्या शिक्षकांनी टीईटी बाबत अस्वस्थ होऊ नये- शिक्षक भारती संघटना

Loading

जुन्या शिक्षकांनी टीईटी बाबत अस्वस्थ होऊ नये-

शिक्षक भारती संघटना

जळगांव  प्रतिनिधी
नुकत्याच सुप्रीम कोर्टाने पाच वर्षापेक्षा जास्त सेवा बाकी आहेत अशा सर्व शिक्षकांनी टीईटी द्यावी असा निर्णय दिलेला आहे. सदर प्रकरण एका अल्पसंख्यांक संस्थेबाबतीत होते. परंतु सर्व समावेशक असा निर्णय झाला चा प्राथमिक चर्चा दिसत आहे यातून कोणत्याही शिक्षकांनी घाबरून जाऊ नये कारण अद्याप केंद्र सरकार व त्यानंतर राज्य सरकार ने याबाबतीत कोणतीही भूमिका घेतलेली नाही इतक्या 80 टक्के शिक्षकांना नाराजीचे सूर कोणतेही सरकार अंगावर घेणार नाही. कारण सरकार जनतेसाठी असते .व शिक्षण विभागातील शिक्षक हा महत्वाचा घटक आहे यामध्ये अनेक गुंता आहेत जुन्या लोकांची नियुक्ती करताना तत्कालीन नियम व आता नवीन शिक्षकांमध्ये टीईटी कंपल्सरी आहे,. त्यामुळे घाबरून जाऊ नये शासनाची भूमिका स्पष्ट होताच शिक्षक भारती शिक्षकांच्या नौकऱ्या वाचवण्यासाठी काय करता येणार याबाबत आजच्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली वेळ पडल्यास शासनावर दबाव आणणे विधी तज्ञांची टीम तयार ठेवणे शासनाबरोबर चर्चा करणे अशा अनेक गोष्टींवर विचार विनिमय करण्यात आलेला आहे. शासनाची भूमिका समोर येत नाही तोपर्यंत शिक्षकांनी जास्त विचार करू नये. सर्व शिक्षकांनी नोकरीची जबाबदारी शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे सर कार्याध्यक्ष सुभाष मोरे सर समाजवादी विचाराचे शिक्षक भारतीचे नेते मा,. आ, कपिल पाटील घेत आहेत अशी माहिती नारायण वाघ जिल्हाधक्ष शिक्षक भारती जळगाव यांनी प्रसार माध्यमांना दिली.यावेळी राज्यभरातील पदाधिकारी यांनी चर्चेत सहभाग नोंदवला

4 thoughts on “जुन्या शिक्षकांनी टीईटी बाबत अस्वस्थ होऊ नये- शिक्षक भारती संघटना

  1. मी 2010 च्या CET लागले आहे परंतु माझी नेमणूक सप्टेंबर 2011 ची आहे मग मला CET द्यावी लागेल का

  2. अभ्यासपूर्ण असेच निर्णय घेण्याची पायंडा कायम ठेवलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *