“अनधिकृत शाळांच्या विरोधात ठाम लढा – कारवाई न झाल्यास दि. १० सप्टेंबरपासून आमरण उपोषणास विश्वास पाटील यांचा इशारा”  उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिले पत्र..
1 min read

“अनधिकृत शाळांच्या विरोधात ठाम लढा – कारवाई न झाल्यास दि. १० सप्टेंबरपासून आमरण उपोषणास विश्वास पाटील यांचा इशारा” उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिले पत्र..

Loading

“अनधिकृत शाळांच्या विरोधात ठाम लढा – कारवाई न झाल्यास दि. १० सप्टेंबरपासून आमरण उपोषणास विश्वास पाटील यांचा इशारा”

उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिले पत्र..

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) –
तालुक्यात बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या अनधिकृत शाळांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत असून, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात श्री. विश्वास दशरथ पाटील, अध्यक्ष – श्री विश्वासराव पाटील बहुउद्देशीय संस्था, जानवे यांनी प्रांताधिकारी नितीन कुमार मुंडावरे व तहसीलदार रुपेश कुमार सुराणा (अमळनेर) यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मागील काही वर्षांपासून तालुक्यात अनधिकृत शाळा सुरू असून, शिक्षणाधिकाऱ्यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. उलट आधी फक्त एकच अनधिकृत शाळा होती, परंतु आता त्यांची संख्या वाढून तीनवर पोहोचली आहे.

विश्वास पाटील यांनी पत्रात स्पष्ट नमूद केले आहे की –

अशा शाळा मान्यताप्राप्त शाळांच्या टक्केवारीवर परिणाम करतात.

पालक दिशाभूल होतात आणि प्रशासन मात्र तपासणीस घाबरते.

फक्त चार कागद तपासण्यासाठीही अधिकाऱ्यांना विलंब होतो, ही शिक्षण व्यवस्थेची शोकांतिका आहे.

या पार्श्वभूमीवर त्यांनी जाहीर केले आहे की, जर तातडीने कारवाई झाली नाही तर दि. १० सप्टेंबर २०२५ रोजी पंचायत समिती अमळनेरच्या आवारात ते आमरण उपोषणास बसणार आहेत.
त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अनधिकृत शाळा तातडीने बंद करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी विश्वास पाटील यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *