गणेशभक्तीत न्हाललेला सन्मान – शहरातील अनेक गणेश मंडळांकडून मा. नगरसेवक विक्रांत पाटील व सामाजिक कार्यकर्त्या स्वप्ना पाटील यांना आरतीचा मान व सत्कार
1 min read

गणेशभक्तीत न्हाललेला सन्मान – शहरातील अनेक गणेश मंडळांकडून मा. नगरसेवक विक्रांत पाटील व सामाजिक कार्यकर्त्या स्वप्ना पाटील यांना आरतीचा मान व सत्कार

Loading

 


गणेशभक्तीत न्हाललेला सन्मान – शहरातील अनेक गणेश मंडळांकडून मा.नगरसेवक विक्रांत पाटील व सामाजिक कार्यकर्त्या स्वप्ना पाटील यांना आरतीचा मान व सत्कार

अमळनेर प्रतिनिधी :—
गणेशोत्सवाच्या आजच्या अकराव्या (११) दिवशी, शहरातील सुप्रसिद्ध भोईवाडा येथील “भोईवाड्याचा राजा” गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत सालाबादप्रमाणे आरतीची सेवा करण्याचा मान मा. नगरसेवक विक्रांत पाटील व सामाजिक कार्यकर्त्या स्वप्ना पाटील यांना लाभला.

विशेष म्हणजे, यावर्षी शहरातील अनेक गणेश मंडळांकडून पाटील दाम्पत्याला आरतीचा मान देण्यात आला व त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत सत्कारही करण्यात आला.

या अनोख्या सन्मानाबद्दल “गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आम्ही मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद मानतो,” असे कृतज्ञ उद्गार मा. नगरसेवक विक्रांत पाटील व सामाजिक कार्यकर्त्या स्वप्ना पाटील यांनी व्यक्त केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *