नंदादीप माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा—
![]()
नंदादीप माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा—
अमळनेर प्रतिनिधी
आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसाहेब ऐ बी चौधरी होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शहापूर येथील एकात्मता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ऐ के धनगर सर उपस्थित होते.विद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी विलास पाटील यांनी शिक्षक दिन म्हणून सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचारी याचां सत्कार केला. या प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच श्री. सुतार सर, धनगर सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक ऐ. बी चौधरी सर यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ऐ. जी पाटील. सर यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.

