अमळनेरमध्ये गणेशोत्सवाच्या आठव्या दिवशी आरती सेवेला भाविकांची गर्दी – भव्य स्वागत, सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळा रंगतदार
1 min read

अमळनेरमध्ये गणेशोत्सवाच्या आठव्या दिवशी आरती सेवेला भाविकांची गर्दी – भव्य स्वागत, सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळा रंगतदार

Loading

अमळनेरमध्ये गणेशोत्सवाच्या आठव्या दिवशी आरती सेवेला भाविकांची गर्दी – भव्य स्वागत, सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळा रंगतदार

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
गणेशोत्सवाच्या आठव्या (८) दिवशी अमळनेर शहरात धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाचा संगम अनुभवायला मिळाला. शहरातील विविध मानाचे गणेशोत्सव मंडळांमध्ये झालेल्या भव्य आरती सेवेला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गणरायाचे दर्शन घेतले.
या दिवशी आरती सेवेचा मान रामेश्वरनगर गणेशोत्सव मंडळ, माळीवाडा-मढी येथील सुप्रसिद्ध क्षत्रिय कांच माळी समाज पंच मंडळाचा मानाचा त्रिमूर्ती गणेशोत्सव, आम्ललेश्वर नगर येथील “आम्ललेश्वर नगरचा राजा” गणेशोत्सव मंडळ, पिंपळेरोड येथील “जगदंब ग्रुपचा राजा” गणेशोत्सव मंडळ, तसेच मुंदडा सिटी येथील मुंदडा सिटी गणेशोत्सव मंडळ यांना लाभला.
आरतीच्या वेळी गणपती बाप्पा मोरयाच्या गजरांनी वातावरण भारून गेले होते. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत टाळ-मृदंगाच्या तालावर भजने गायली, तर युवक-युवतींनी ढोल-ताशांच्या गजरात उत्सवाची रंगत वाढवली. आरतीनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी गणेश मंडळांकडून आरती सेवेचे मानकरी व आगंतुक पाहुण्यांचे फेटे बांधून, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. उपस्थित भाविकांनी दिव्यांच्या प्रकाशात झालेल्या आरती सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते विक्रांत पाटील व सौ. स्वप्ना पाटील यांनी सर्व मंडळांचे आभार मानून असे सांगितले की –
“गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि समाज एकतेचा सण आहे. आरती सेवेमुळे अध्यात्मिक ऊर्जेबरोबरच सामाजिक बंधही दृढ होतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने समाजातील ऐक्याचे दर्शन घडते.”
शहरभरात गणेशमूर्तींच्या सजावट, विद्युत रोषणाई, पारंपरिक नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम यांमुळे गणेशोत्सवाला अधिक उत्साहाची उधाण आली.

सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांची प्रतिक्रिया

“गणेशोत्सव हा फक्त धार्मिक नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐक्याचा संदेश देणारा उत्सव आहे. आरती सेवेमुळे अध्यात्मिक उर्जा मिळते, तसेच समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचे काम होते.
गणेश मंडळांनी दिलेला मान-सन्मान हा आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. या मंडळांचे कार्य हे केवळ उत्सवापुरते मर्यादित नसून, ते सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवतात. अशा उपक्रमांमुळे युवकांना दिशा मिळते आणि समाज एकसंघ होतो.
मी मनःपूर्वक सर्व गणेश मंडळांचे आभार मानतो. गणरायाच्या कृपेने अमळनेर शहरात सदैव सुख-समाधान, ऐक्य आणि प्रगती नांदो हीच प्रार्थना आहे.”

 

काही क्षणचित्रे..

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *