पालक- शिक्षक संघातर्फे ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात शिक्षक व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न*.
1 min read

पालक- शिक्षक संघातर्फे ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात शिक्षक व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न*.

Loading

*पालक- शिक्षक संघातर्फे ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात शिक्षक व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न*.

आज दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव, येथे पालक- शिक्षक संघातर्फे शिक्षकदिनाच्या पूर्व संध्येला शिक्षकांचा सत्कार व विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री सुधाकर गोविंद सोनवणे यांनी गणेश पूजन करून माल्यार्पण केले . ईशस्तवन आणि स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली
याप्रसंगी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या निमित्ताने पालक – शिक्षक संघातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये विशेष कामगिरी बजावणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण करून मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक केले.
पालक शिक्षक संघातर्फे शाळेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. मागील शैक्षणिक वर्षीही अशाच पद्धतीत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले ज्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त कला -गुण व ज्ञानाला चालना मिळते. सामान्य ज्ञान, पठण, वक्तृत्व, स्वरचित कविता, हस्ताक्षर, स्मरणशक्ती, रंगभरण अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपली कला, ज्ञान व कौशल्ये यांचे उत्तम प्रदर्शन केले.
या यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वाटप करून त्यांचे शाळेच्या वतीने कौतुक करून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. तेच शिक्षक दिनाचे औचित्य साधून पालक शिक्षक संघातर्फे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला . शिक्षकांच्या वतीने श्री निर्मल चतुर आणि खुशबू चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले पालक शिक्षक संघाचे आभार मानले
विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये शिक्षक, पालक आणि मार्गदर्शक यांचा मोलाचा वाटा आहे. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांनी केले तर सुत्रसंचालन दिपाली खडके यांनी केले तर आभार प्रतिभा लोहार यांनी केले
पालक शिक्षक संघाचे
सचिव – सौ. प्रियंका आनंद फेगडे व इतर पदाधिकारी – दीपक पाटील, सविता विसपुते, भाग्यश्री साळुंखे ,सुरेखा पाटील, वैशाली चौधरी, सोनाली दाभाडे, संगीता बावस्कर, योगिता सपकाळे आणि सेजल चौधरी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ,नुतन वराडे, महेंद्र मिरकुटे, विवेक मोरे, अनिल शिवदे यांनी परिश्रम घेतले

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *