स्व. ओंकार नाना पुण्यस्मरण दिनानिमित्त निबंध स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभ संपन्न
![]()
स्व. ओंकार नाना पुण्यस्मरण दिनानिमित्त निबंध स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभ संपन्न
अमळनेर प्रतिनिधी
स्व. ओंकार नाना यांच्या २५ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त एस. ओ. माळी सर परिवार आणि प्रफुल्ल कॉमर्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज उत्साहात पार पडला.
📜 स्पर्धेसाठी दिलेले विषय –
1️⃣ “मातापित्यांची सेवा – जबाबदारी की ओझे?”
2️⃣ “आई-वडिलांचे प्रेम: आजही अजरामर की बदलत्या मूल्यांमध्ये हरवलेले?”
3️⃣ “एक दिवस आपल्या मुलांनाही म्हातारपण येईल” – पिढ्यानपिढ्या चालणारा जीवनचक्राचा संदेश.
या निबंध स्पर्धेला एकुण 18 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सहभागी विद्यार्थ्यांनी मातापित्यांविषयी कृतज्ञता, संस्कार आणि बदलत्या समाजातील मूल्ये या विषयांवर हृदयस्पर्शी विचार त्यांच्या लेखनातून मांडले.
विजेत्यांना रोख स्वरुपात बक्षिसे व प्रमाणपत्रांचे वितरण डॉ. एस.ओ. माळी सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते डॉ. एस.ओ. माळी सर यांनी आपल्या मनोगतामध्ये मातापित्यांची सेवा, त्यांच्याप्रती आदरभाव आणि कुटुंबातील मूल्यसंस्कार जपण्याचे महत्व अधोरेखित केले.
या निबंध स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये पालकांविषयी आदर व समाजातील मूल्यांचे महत्व अधोरेखित करणारी जाणीव दृढ झाली.

