राष्ट्रीय समाजकार्य पंधरवाडा निमित्त समाजकार्य महाविद्यालय अमळनेर च्या विद्यार्थ्यांचा जळगांव गांधी तीर्थ अभ्यास दौरा
![]()
राष्ट्रीय समाजकार्य पंधरवाडा निमित्त समाजकार्य महाविद्यालय अमळनेर च्या विद्यार्थ्यांचा जळगांव गांधी तीर्थ अभ्यास दौरा
अमळनेर प्रतिनिधी
नॅशनल असोसिएशन ऑफ प्रोफेशनल सोशल वर्क इन इंडिया NAPSWI,
महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रोफेशनल सोशल वर्क एज्युकेटर्स MASWE
नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर जिल्हा जळगाव यांचे विद्यमाने जळगाव येथील जैन हिल्स येथे गांधी तीर्थ अभ्यास दौरा करणेत आला.
अंमळनेर येथील समाजकार्य महाविद्यालय मार्फत एम.एस.डब्ल्यू. द्वितीय वर्ष तसेच बी.एस.डब्ल्यू. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांचा
गांधी तीर्थ, जळगाव येथे अभिमुखता व अध्ययन दौरा आयोजित करण्यात आला .
या दौऱ्याचा उद्देश विद्यार्थ्यांना महात्मा गांधींचे विचार, जीवन तत्त्वज्ञान, मूल्ये व त्यांचे सामाजिक कार्याशी असलेले नाते समजून घेणे हा आहे.
या अभ्यास कार्यक्रमात विविध बाबींचा समावेश आहे.
गांधी तीर्थच्या उद्दिष्टे व कार्याविषयी मार्गदर्शन.
गांधी संग्रहालय, वाचनालय व संशोधन केंद्राला भेट.
गांधीवादी तत्त्वज्ञान व सामाजिक कार्य मूल्ये, शांती निर्माण, ग्रामीण विकास व शाश्वतता यावरील चर्चासत्र.
या दौऱ्याद्वारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक ज्ञान व व्यवहार्य आकलन अधिक दृढ होईल तसेच गांधीवादी मूल्ये जीवन व व्यावसायिक कार्यात अंगीकारण्यास प्रोत्साहन मिळेल.
सर्व संबंधित साठ विद्यार्थ्यांनी दौऱ्यात उत्साहाने सहभागी होऊन ग्रामीण विकास, शेती, समुदाय विकास बाबत सखोल अभ्यास केला.
प्रा विजयकुमार वाघमारे, डॉ भरत खंडागळे, प्रा धनराज ढगे, डॉ अस्मिता सर्वैया यांचे सह विद्यार्थी उपस्थित होते.

