जैताणेत ७ सप्टेंबरला अखिल भारतीय माळी महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा साक्री तालुकास्तरीय गुणगौरव सोहळा! ,*माळी समाजातील गुणवंत विद्यार्थी व पालकांना सहभागी होण्याचे आवाहन!*
![]()
जैताणेत ७ सप्टेंबरला अखिल भारतीय माळी महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा साक्री तालुकास्तरीय गुणगौरव सोहळा!
*माळी समाजातील गुणवंत विद्यार्थी व पालकांना सहभागी होण्याचे आवाहन!*
जैताणे-निजामपूर (ता.साक्री) : अखिल भारतीय माळी महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा साक्री तालुकास्तरीय गुणगौरव समारंभ रविवार, दि.०७ सप्टेंबर २०२५ रोजी जैताणे (ता.साक्री) येथील माळी समाज मंगल कार्यालयात दुपारी ठीक २:०० वाजता राष्ट्रीय अध्यक्ष मा.विलासराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. मानद अध्यक्ष बापूसाहेब डी. के. माळी, महासंघाचे नवनिर्वाचित प्रदेश उपाध्यक्ष तथा नाशिक विभागीय अध्यक्ष वासुदेव देवरे, जिल्हाध्यक्ष आर.के.माळी यांच्यासह महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष-२०२४-२५ मध्ये १०वी/१२वी, पदविका, पदवी, पदव्युत्तर, मेडिकल, इंजिनिअरिंग, नेट, सेट, पीएचडी, एमपीएससी, यूपीएससी आदी परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले असतील त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार होणार आहे. तसेच समाजामध्ये विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व विशेष पुरस्कारप्राप्त समाज बांधवांचा देखील सत्कार होणार आहे.
शैक्षणिक गुणवत्तेचा निकष खालीलप्रमाणे असेल.
इ.१०वी : ८५% व त्यापेक्षा जास्त
इ.१२वी : ७५% व त्यापेक्षा जास्त
पदवी/पदविका/पदव्युत्तर: ७०% व त्यापेक्षा जास्त
(पदवी, पदविका, पदव्युत्तर पूर्ण असावी. अपूर्ण चालणार नाही.)
यूपीएससी/एमपीएससी/नेट/सेट/पीएचडी/मेडिकल/इंजिनिअरिंग/लॉ/कला/क्रीडा/संगीत आदी क्षेत्रात यश/निवड/पुरस्कार…
(टीप : गुणवंत विद्यार्थी हा साक्री तालुक्याचा रहिवासी असावा किंवा साक्री तालुक्यात किमान १०वी/१२वी पर्यंतचे शिक्षण घेतलेला असावा.)
वरीलप्रमाणे गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दि.५ सप्टेंबर २०२५ पर्यंत भारत सायबर, शिवाजी रोड, श्रीराम जनरल स्टोअर्स, खुडाणे चौफुली, जैताणे याठिकाणी गुणपत्रिकांच्या झेरॉक्स हार्डकॉपी जमा कराव्यात. तसेच खालील व्हाट्सऍप क्रमांकावर आपल्या मार्कशीट/गुणपत्रिकेची प्रत पीडीएफ फाईल स्वरूपात पाठवावी. (मोबाईल क्र.9960010331)
पिंपळनेर मंडळातील गुणवंत विद्यार्थ्यांनी मंडळाध्यक्ष श्री.धनंजय घरटे (7666412591) यांच्याशी संपर्क साधावा.
कार्यक्रमास येताना गुणवंत विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत कार्यक्रमस्थळी जमा करावी व पालकांना देखील सोबत आणावे. कार्यक्रम संपन्न झाल्यावर गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी अखिल भारतीय माळी महासंघातर्फे चहापान व अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली आहे.


मान्यवरांच्या हस्ते पाठीवर कौतुकाची थाप मिळावी म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या गुणगौरव सोहळ्यात पालकांसह सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय माळी महासंघाचे धुळे जिल्हाध्यक्ष आर.के.माळी, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.भगवान जगदाळे, जिल्हा उपाध्यक्ष गुलाब माळी, कर्मचारी आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र माळी, राष्ट्रीय अध्यक्षांचे सचिव काशिनाथ माळी, विभागीय प्रसिद्धीप्रमुख राजेंद्र गवळी, सल्लागार अनिल सोनवणे, नंदू खैरनार, नंदकुमार जाधव, भूषण भदाणे, डॉ.मनोज भागवत, सुशीलकुमार जगदाळे, साक्री मंडळाध्यक्ष तुकाराम खलाणे, पिंपळनेर मंडळाध्यक्ष धनंजय घरटे, जैताणे शहराध्यक्ष मनिष संजय खैरनार, शहर उपाध्यक्ष प्रमोद गोकुळ महाजन, माजी शहराध्यक्ष दिपक सूर्यवंशी, माजी उपाध्यक्ष रवींद्र देवरे, कायदेशीर सल्लागार ऍड.विकास माळी आदींसह महासंघाचे तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे…

