अमळनेर : प्रभाग क्र. 12 च्या रचनेवर सामाजिक कार्यकर्त्यांची हरकत नियमभंग व राजकीय हेतूचा आरोप
![]()
अमळनेर : प्रभाग क्र. 12 च्या रचनेवर सामाजिक कार्यकर्त्यांची हरकत
नियमभंग व राजकीय हेतूचा आरोप
अमळनेर प्रतिनिधी) :
दि. 18 ऑगस्ट 2025 रोजी अमळनेर नगर परिषदेच्या वतीने शहराची नवी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. यावर्षी प्रभागांची संख्या 17 वरून वाढवून 18 करण्यात आली आहे. तथापि, प्रभाग क्र. 12 च्या रचनेविषयी गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कंखरे यांनी प्रभाग क्र. 12 संदर्भात निवडणूक आयोगाच्या नियमांकडे दुर्लक्ष करून “नियमभंग व राजकीय हेतूने रचना करण्यात आली” असा गंभीर आरोप करत औपचारिक हरकत नोंदवली आहे.
त्यांनी सादर केलेल्या हरकतींमध्ये –
प्रभाग क्र. 12 मध्ये नैसर्गिक सीमांचा विचार करण्यात आलेला नाही.
अनुसूचित जाती-जमातींचे विभाजन करून अन्यायकारक रचना केली आहे.
ताडेपुरा वस्तीस दोन तुकड्यांमध्ये विभागून प्रभाग 3 व 12 ला जोडण्यात आले आहे.
भौगोलिक सलगतेचा अभाव असून नदी, राजमार्ग मधे येऊनही जोडणी करण्यात आली आहे.
“निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिले असताना नियमांचे उल्लंघन करण्यात आलेले दिसते,” असा ठपका या हरकतीत ठेवण्यात आला आहे.
या प्रसंगी निवेदन देताना चंद्रकांत कंखरे यांच्यासह पंकज चौधरी, पंकज भोई, राहुल कंजर, विपुल पाटील, विलास कंखरे, गोलू लांडगे, कुंदन पाटील, पारस धाप, राहुल पाटील, अक्षय अग्रवाल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

