पावरा भिका लेहर्या सेट परीक्षा उत्तीर्ण*
1 min read

पावरा भिका लेहर्या सेट परीक्षा उत्तीर्ण*

Loading

*पावरा भिका लेहर्या सेट परीक्षा उत्तीर्ण*
——————————————–
अमळनेर प्रतिनिधी :
प्रताप महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थी पावरा लेहर्या भिका यांनी *महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (SET) 2025 अर्थशास्त्र विषयातून उत्तीर्ण करून उज्ज्वल यश मिळवले आहे.* अर्थशास्त्र विभागात शैक्षणिक वर्ष 2019 यावर्षी पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण होऊन त्यांनी या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालय, विभाग, आणि कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे.
पावरा लेहर्या भिका यांच्या या यशामागे अर्थशास्त्र विभागासोबत सीसीएमसी विभागाचेही मोलाचे योगदान आहे. महाविद्यालयाच्या प्रशासकीय आणि विभागातील अभ्यासाच्या वातावरणामुळे तसेच नियमित मार्गदर्शनामुळे त्यांच्या यशात भर पडली आहे. विभागामार्फत घेतले गेलेले समुपदेशन, स्पर्धा परीक्षेची तयारी शिबिरे,मार्गदर्शन आणि कार्यशाळा या सर्वांचे फलित म्हणजे यश आहे.
प्रस्तुत यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण जैन, उपप्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव, सीसीएमसी विभागप्रमुख डॉ.विजय तुंटे, डॉ.धीरज वैष्णव,डॉ.अमित पाटील, डॉ. व्ही. बी. मांटे,ग्रंथपाल दिपक पाटील,डॉ.किरण गावित,डॉ.विलास गावित,प्रा.सचिन आवटे, प्रा.सपकाळे,प्रा.हिमांशू गोसावी,डॉ.आकाश गव्हाणे,प्रा.सोनूसिंग पाटील,दिलीप शिरसाठ,पराग रविंद्र पाटील यांनी पावरा भिका यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आणि पुढील शैक्षणिक क्षेत्रातील भविष्याच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
पावरा लेहर्या भिका यांचे हे यश महाविद्यालयातील अन्य विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. अथक परिश्रम, दृढ इच्छाशक्ती आणि योग्य मार्गदर्शन हेच यशाचे गमक आहे, हे त्यांनी त्यांच्या ध्येयपूर्तीच्या मार्गाने दाखवून दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *