वासरेत ढगफुटीचा कहर; सभापती अशोक पाटील यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत नागरिकांना दिला दिलासा
1 min read

वासरेत ढगफुटीचा कहर; सभापती अशोक पाटील यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत नागरिकांना दिला दिलासा

Loading

 

वासरेत ढगफुटीचा कहर; सभापती अशोक पाटील यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत नागरिकांना दिला दिलासा

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
काल दि. 29 ऑगस्ट 2025 रोजी अमळनेर तालुक्यातील वासरे गाव परिसरात झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीमुळे अनेक घरांचे तसेच शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे गावकरी हतबल झाले होते.
या गंभीर परिस्थितीत गावकऱ्यांना धीर देण्यासाठी व त्यांची आर्त व्यथा जाणून घेण्यासाठी अमळनेर बाजार समितीचे सभापती मा. दादासो अशोक पाटील यांनी वासरे गावाची तत्काळ पाहणी केली. त्यांनी स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधून सांत्वन व्यक्त केले.
फक्त पाहणीवर न थांबता, त्यांनी तातडीने मदतकार्याची गाडी राबवत तांदूळ, डाळ, खाद्यतेल व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून गावकऱ्यांना मोठा दिलासा दिला. आपत्तीच्या काळात नागरिकांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी लोकप्रतिनिधींची जबाबदारी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
गावकऱ्यांनी या तातडीच्या मदतीबद्दल सभापतींचे आभार मानले असून, “आपत्तीच्या काळात मायेचा हात मिळाल्याने हिम्मत वाढली” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *