प्रताप’ चा राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा*
![]()
*राष्ट्रीय क्रीडा दिवस*
(२९ ऑगस्ट २०२५)
—————————————
*’प्रताप’ चा राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा*
—————————————
अमळनेर प्रतिनिधी :
प्रताप महाविद्यालय (स्वायत्त)अमळनेर क्रीडा विभाग आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिवसाच्या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी खा.शि मंडळाचे मा.सचिव तथा उप प्राचार्य प्रा.पराग पाटील , प्रमुख अतिथी उपप्राचार्य प्रा. एच. डी. जाधव, उप प्राचार्या प्रा.कल्पना पाटील, उपप्राचार्य डॉ.योगेश तोरवणे, डॉ. डी.आर.चौधरी, डॉ.नलिनी पाटील, डॉ.अमोल मानके, प्रा.अवीत पाटील, डॉ.रवि मराठे, प्रा.जयेश साळवे , प्रा.अर्चना पाटील,क्रीडा प्रशिक्षक सचिन पवार,मच्छिन्द्र पारधी आदी उपस्थित होते.
या निमित्त मान्यवरांनी प्रतिमा पूजन व विविध खेळातील खेळाडूंचे स्टॅचूचे अनावरण केले. तदनंतर जुदो खेळातील खेळाडूंनी अतिशय उत्कृष्ट खेळाचे सादरीकरण केले.
प्रा.एच.डी.जाधव यांनी खेळाडूंना मार्गदर्शनपर माहिती सांगितली. विद्यापीठ अधिसभा सदस्य वा जिमखाना समन्वयक डॉ.एस बी नेरकर यांनी क्रीडा दिवसाविषयी महत्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले. याप्रसंगी विद्यापीठ खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला तसेच बॅडमिंटन, बुद्धिबळ, मास रेसलिंग स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आल्या.
राष्ट्रीय क्रीडा दिवस कार्यक्रमाचे आयोजन वरिष्ठ महाविद्यालय क्रीडा संचालक डॉ.सचिन पाटील, जुदो प्रशिक्षक श्री. सचिन वाघ सर, श्री. प्रशांत देवकते यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अवीत पाटील यांनी केले तर आभार क्रीडा संचालक डॉ.सचिन पाटील यांनी मानले.प्रस्तुत स्पर्धेच्या यशासाठी कनिष्ठ व वरिष्ठ क्रीडा विभागातील सर्व खेळाडूंनी सहकार्य केले.

