आदर्श आई गौरव पुरस्कार’ने सन्मानित कस्तुराबाई चौधरी –समाजासाठी दीपस्तंभ ठरलेल्या मातृशक्तीचा गौरव
![]()
‘आदर्श आई गौरव पुरस्कार’ने सन्मानित कस्तुराबाई चौधरी –समाजासाठी दीपस्तंभ ठरलेल्या मातृशक्तीचा गौरव
धरणगाव प्रतिनिधी
येथील श्रीमती कस्तुबाई नारायण चौधरी यांना एरंडोल, येथील ऊर्जा सामाजिक शैक्षणिक संस्था, न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस व न्यूज खानदेश वार्ता परिवारातर्फे नुकताच स्वातंत्र्यदिनी आई महोत्सव अंतर्गत आदर्श आई गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सहकार भारतीचे राष्ट्रीय मंत्री दिलीपदादा पाटील यांचे हस्ते त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देवून गौरवान्वित करण्यात आले. याप्रसंगी श्रोत्यांनी तुडुंब भरलेलं सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेले होते.
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे.! हा मंत्र जपणाऱ्या आयोजक प्रविण महाजनचे दिलिपदादा पाटील यांनी मनःपूर्वक कौतुक केले. माता-पिता हेच खरे देवरुप आहेत त्यांना कधिही अंतर देवू नका असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. कस्तुराईंचा जीवन कार्याचा वेध घेतांना त्यांनी आईंच्या कष्टाची, समर्पणाची आणि कृतार्थ जगण्याची गाथाच उलगडून दाखविली. प्रा.बी.एन.चौधरी (मुख्याध्यापक), भरत चौधरी (संपादक), श्रीमती अलकाबाई चौधरी (गृहीणी) आणि सौ. कल्पनाबाई चौधरी (शिक्षिका) यांना घडविणाऱ्या कस्तुराई समाजासाठी दीपस्तंभ आहेत असे गौरवोद्गार त्यांनी काढले. या प्रसंगी घराला घरपण देणाऱ्या देवरुप ४० माता १४ पितांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन निवृत्त तहसीलदार अरुणभाऊ माळी यांनी केले. या प्रसंगी एडवोकेट मोहन बी शुक्ला, वास्तू विशारद तथा रचनाकार कल्पेश कलंत्री, निवृत्त मुख्याध्यापक पंडित साळी, एरंडोल नगर वाचनालयाचे अध्यक्ष जगदीश ठाकूर, रा.ति.काबरे विद्यालयाचे शिक्षक दिनकर पाटील, बीएसएफचे निवृत्त इन्स्पेक्टर तुळशीराम साळी, मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, निवृत्त वनपाल राजू ठाकूर, व्यंगचित्रकार तथा साहित्यिक प्रा बी एन चौधरी, जेष्ठ संपादक भरत चौधरी, एरंडोल शहर संघर्ष समितीचे उपाध्यक्ष नामदेव पाटील, कायदा विषयक सल्लागार एडवोकेट दिनकर पाटील आणि मान्यवरांच्याव्यासपीठावर उपस्थित होते. या गौरव सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी सत्कारार्थींची मुलं, सुना, नातवंडे व आप्तेष्ट परिवारासह उपस्थित होते.
प्रत्येकाने आपलं आयुष्य सुंदरपणे जगलं पाहिजे. त्याबरोबरच आपलं आरोग्य ही जपलं पाहिजे असा विचार प्रविण महाजन यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रविण महाजन व आभार प्रदर्शन सौ. अंजली महाजन यांनी केले.
(छायाचित्र : श्रीमती कस्तुराईंचा सत्कार करतांना दिलिपदादा पाटील आणि मान्यवर)

