वाढदिवस विशेष..  संघटनातून समाजप्रबोधनाची वाटचाल – काशिनाथ नारायण माळी
1 min read

वाढदिवस विशेष.. संघटनातून समाजप्रबोधनाची वाटचाल – काशिनाथ नारायण माळी

Loading

वाढदिवस विशेष..

संघटनातून समाजप्रबोधनाची वाटचाल – काशिनाथ नारायण माळी

धुळे प्रतिनिधी
आपल्या सर्वांचे लाडके प्रेमळ व्यक्तीमत्व, तसेच माळी समाज संघटन करण्यात व कार्यकर्ते जोडण्यात अग्रेसर असलेले तसेच वयाच्या २१ साव्या वर्षापासून माळी महासंघा द्वारे अनेकांना समाजाच्या विकासात्मक कामात प्रभावित करणारे असे “श्री काशिनाथ नारायण माळी” प्रथम त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

माळी सरांचे स्वभावाचे अनेक पैलू आहेत. नंदुरबार अ. भा. माळी महासंघाचे जिल्हध्यक्ष असतांना एकाच दिवशी महासंघाच्या ११ ठिकाणी शाखेच्या उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते श्री काशिनाथ माळी सर यांनी केले. नंदुरबार शहरात अ. भा. माळी महासंघाचे खूप मोठे संघटन उभे करून व समाजातील काही मान्यवरांना एकत्र आणून महात्मा ज्योतिबा फुले नागरी सहकारी पतसंस्था स्थापली. त्यानंतर काही दिवसांनी महिला कर्मचारी महासंघाच्या पदाधिकारी वतीने महिलांच्या विकासासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला नागरी सहकारी पतसंस्था समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत स्थापण्यात आली, यात त्यांचा मोठा सहभाग होता.

समाजातील सर्व पोटजातीतील कर्मचारी बंधू यांचे संघटन केले. तसेच संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील माळी समाजाचा “जनगणना” करून पुस्तिका सर्व पदाधिकारी सोबत सहभाग घेवून छापली. माळी महासंघात त्यांचे उत्कृष्ट कार्य पाहून धुळे जिल्ह्यात पुन्हा काम करण्याची संधी दिली व त्या संधीचे सोने करून त्यांना नाशिक विभागावर कामाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर त्यांना राष्ट्रीय अध्यक्षांचे सचिव म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली.

सध्या ते –

राष्ट्रीय अध्यक्षांचे सचिव – अखिल भारतीय माळी महासंघ

उपजिल्हाध्यक्ष – भाजपा शिक्षक आघाडी, धुळे जिल्हा

माजी स्वीकृत संचालक – धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्था, धुळे

जिल्हा सहसचिव – विज्ञान व गणित अध्यापक मंडळ, धुळे जिल्हा

उपशिक्षक – कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ता. साक्री, जि. धुळे

पत्रकार – दैनिक शब्दगंगा, धुळे

अशा विविध आघाड्यांवर ते प्रभावीपणे कार्यरत आहेत. त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सध्या ते कै. बळीरामदादा माध्य विद्यालयात उपशिक्षक म्हणून कार्यरत असून समाजकार्य, पत्रकारिता आणि संघटनात्मक नेतृत्व या तीनही क्षेत्रात त्यांनी ठसा उमटविला आहे.
सरांना ५४ व्या वाढदिवसाच्या अखिल भारतीय माळी महासंघ, धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष, विविध आघाडीचे प्रमुख तसेच धुळे महानगरचे अध्यक्ष व सर्व आघाडीचे प्रमुख व पदाधिकारी यांच्या कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

💐☘️🌹🌷🍟🍿🍫🍫

शुभेच्छुक
श्री हरीशचंद्र रेंडे
(धुळे शहराध्यक्ष)
अखिल भारतीय माळी महासंघ, धुळे

 

One thought on “वाढदिवस विशेष.. संघटनातून समाजप्रबोधनाची वाटचाल – काशिनाथ नारायण माळी

  1. हार्दिक अभिनंदन आणि हृदयापासून हार्दिक शुभेच्छा सरजी! 👏👏🌹🌹🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *