लक्ष्य अचूक… पुष्पराज वाघ यांची रायफल स्पर्धेत ब्राँझ कामगिरी
![]()
*महाराष्ट्र रायफल असोसिएशन फायर आर्म स्पर्धेत पुष्पराज नारायण वाघ यांनी पटकावले ब्रांझ मेडल*
जळगांव प्रतिनिधी
महाराष्ट्र रायफल असोसिएशनची फायर आर्म स्पर्धा दि. 22/08/2025 ते 25/08/2025 बालेवाडी पुणे येथे संपन्न झाली त्या स्पर्धेत पुष्पराज नारायण वाघ हा फ्री पिस्तोल, स्टॅंडर्ड पिस्तोल, स्पोर्ट स्पर्धेत पात्र झाला स्टॅंडर्ड फिस्टोर या स्पर्धेत महाराष्ट्र मधून तिसऱ्या क्रमांकावर राहून ब्रांझ मेडल पटकावले. 10 मीटर एअर पिस्टोल स्पर्धेत पुष्पराज याने अगोदरच दोन गोल्ड मेडल व एक सिल्वर मेडल पटकावले आहे. पुष्पराज हा जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनच्या विद्यार्थी असून त्याला मा. दिलीप गवळी सर व पुणे येथे शिवराज ससे हे बालेवाडी येथे कोच करत आहेत. जैन ग्रुप ने 25000 रुपयाचे स्पोर्ट्स बूट देऊन पुष्पराज ला मदत केलेली आहे.
वेस्ट झोन शूटिंग कॉम्पिटिशन पिस्टोल (25 मिटर व 50 मीटर) 17/09/2025 ते 22/09/2025 गोवा येथे आयोजित केली असून त्यात पुष्पराज फ्री पिस्तोल, स्टॅंडर्ड पिस्तोल, स्पोर्ट मध्ये स्पर्धा खेळणार आहे.

