दुर्मिळ पशुपक्षी व प्राण्यांसाठी वृक्षारोपण उपक्रम*  *श्री श्री वृक्ष बॅंक व स्वराज्य देशा संस्थेचा पुढाकार*
1 min read

दुर्मिळ पशुपक्षी व प्राण्यांसाठी वृक्षारोपण उपक्रम* *श्री श्री वृक्ष बॅंक व स्वराज्य देशा संस्थेचा पुढाकार*

Loading

*दुर्मिळ पशुपक्षी व प्राण्यांसाठी वृक्षारोपण उपक्रम*

*श्री श्री वृक्ष बॅंक व स्वराज्य देशा संस्थेचा पुढाकार*

छत्रपती संभाजीनगर : बजाजनगर
पुढील पिढ्या व दुर्मिळ पशुपक्षी-प्राणी यांना जगण्यासाठी योग्य वातावरण मिळावे या उद्देशाने श्री श्री वृक्ष बॅंक आणि स्वराज्य देशा या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या प्रमाणात एन आर बी चौक येथे वृक्षारोपण मोहिम राबविण्यात आली. या उपक्रमांतर्गत ४० दुर्मिळ पशुपक्षी व प्राण्यांसाठी उपयुक्त अशा प्रजातींची रोपे लावण्यात आली.
*या कार्यात स्वराज्य देशा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मुरलीधर बेडगे, श्री श्री वृक्ष बॅंक चे संस्थापक अध्यक्ष रत्नाकर मोरे*, तसेच वृक्षारोपण समिती सदस्य पोपट मरकड, केदार स्वामीनाथन,रामराव अनंमवाड, रविकिरण सोमासे, सचिन प्रधान, विनोद यादव , महिलांनी यांनी विशेष परिश्रम घेतले.
या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे संस्थेची टीम दर आठवड्याला नियमित वृक्षारोपण करत असून, देशसेवेचा एक भाग म्हणून हे कार्य अखंड सुरू आहे. आतापर्यंत या टीमच्या प्रयत्नांतून ३५०० हून अधिक वृक्षारोपण यशस्वीरित्या पार पडले आहे. संपूर्ण पावसाळ्यात हा उपक्रम सुरू राहणार असून, वर्षभर दुर्मिळ वृक्षांचे बीज संकलन, त्यापासून रोपटी तयार करणे व त्यांना वृक्षरूप देणे हे कार्य सातत्याने राबविले जाते.
🌱 पर्यावरणीय महत्व
या वृक्षारोपण मोहिमेमुळे हवामानातील वाढते प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. झाडांमुळे कार्बन शोषण व ऑक्सिजन निर्मिती वाढेल, जमिनीची धूप रोखली जाईल, तसेच अनेक दुर्मिळ पक्षी व प्राण्यांना नैसर्गिक अधिवास उपलब्ध होईल. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मोठे योगदान मिळणार आहे.
🤝 जनसहभागाचे आवाहन
आयोजकांनी समाजातील सर्व घटकांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थी, युवक, शाळा-कॉलेज, स्वयंसेवी संस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांनी वृक्षारोपणात योगदान द्यावे, “एक रोप लावा – पुढील पिढीचे जीवन वाचवा” हा संदेश प्रत्येकाने आचरणात आणावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *